आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्लगइन्स म्हणजे काय ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


तुम्ही नेट र्सफिंग करताना एक वेबसाइट व्यवस्थित लोड होताना दुस-या लिंकवर क्लिक केल्यावर त्या पानावरचा मजकूर पाहायला मिळत नाही. तिथे लिहून येते की XYZ plugin तुमच्या संगणकावर नाही. तुम्ही थोडे गोंधळता. हे आणखीन काय नवीन टेक्निकल लोढणे?

प्लगइन्स हा आवश्यक सॉफ्टवेअरचा कोड आहे ज्यामुळे प्रोग्रॅम किंवा अ‍ॅप्लिकेशनला मदतच मिळते. सर्वमान्य प्लगइन आहे अडोबचे फ्लॅश प्लेयर. हे प्लगइन संगणकावर नसेल तर काय होईल? उदा. वेबपेजवरच्या जाहिराती, माहिती, फोटो, सिनेमांचे व्हिडिओज दिसणार नाहीत. इतरही प्लगइन्स वेबवर उपलब्ध आहेत. काही प्लगइन्स सोशल मीडिया नेटवर्किंगकरिता, परदेशी भाषा मुळाक्षरांकरिता, तांत्रिक सॉफ्टवेअर शिकण्यासाठी वापरले जातात.
हे प्लगइन्स खरंच तुम्हाला पाहिजे आहेत का?

संगणकावर प्लगइन्स किंवा add-on ची सोय असेल तर ते संगणकावर install असणे केव्हाही चांगले. हे प्लगइन्स टाकताना संगणकाच्या स्क्रीनवर तशा सूचना मिळतात. फायरफॉक्स, गुगल क्रोम ब्राउझरमध्ये अ‍ॅड ऑन किंवा प्लग-इन्स आहेत. गुगल क्रोम ब्राउझरमध्ये गेलात, extensions असे दिले की अनेक प्लगइन्स दिसतील. जसे गुगल ट्रान्सलेटर, फेसबुक नोटीफिकेशन्स, पासवर्ड मॅनेजर, डू इट टुमॉरो,वेदर अशा अनेक सोयी आहेत. असेच फायरफॉक्स, एक्सप्लोररमध्येही खजिना सापडेल काही विध्वंसक लोक प्लगइन्ससारखी दिसणारी सॉफ्टवेअर्स बनवतात ज्यामुळे अडचणीत येऊ शकता. म्हणूनच सतर्क राहायला हवे. अ‍ॅन्टीव्हायरस सॉफ्टवेअरही अपटुडेट आहे की नाही हेही वेळोवेळी तपासले पाहिजे.

bhagyashree@cyberedge.co.in