स्वच्छता विंडोज-7 ची... / स्वच्छता विंडोज-7 ची...

Jun 29,2012 09:38:32 PM IST

विंडोज-7 मध्ये अनेक टूल्स असे देण्यात आले आहेत की, ज्यांच्या मदतीने संगणक वेळोवेळी स्वच्छ करता येतो. यामुळे कॉम्प्युटरची स्पीड कमी होत नाही. त्याचबरोबर तो हँग होण्याचा त्रासही होत नाही. कॉम्प्युटर असो की लॅपटॉप, तुमच्या डिव्हाइसमध्ये विंडोज-7 आहे तर काही सोप्या पद्धती आम्ही सांगतो -
1. सर्वप्रथम कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपमध्ये देण्यात आलेले बेकार आयकॉन्स हटवा. लक्षात ठेवा आयकॉन्स हटवताना त्यास रिसायकलबीनमधूनही हटवणे गरजेचे आहे.
2. तुमच्या सिस्टिममध्ये एक रिस्टोअर पॉइंट बनवा. त्यायोगे भविष्यात असा कोणताही व्हायरस आला अन् तो डिलीट नाही झाला तरी सिस्टिममध्ये रिस्टोअर झालेला डाटा पूर्णपणे सुरक्षित राहील.
3. कॉम्प्युटरमध्ये सर्च टेम्प फाइलला हटवा. टेम्प फाइलला हटवण्यासाठी टास्कबारमध्ये दिलेल्या रनवर क्लिक करा. रनमध्ये %ळीेस्र% लिहून एन्टरचे बटन दाबा. लगेच टेम्प. फोल्डरच्या सर्व फाइल्स उघडल्या जातील. ज्या फाइल कॉम्प्युटर आपोआप सेव्ह करत असतो त्यानाही हटवा.
4. हार्ड ड्राइव्हमध्ये जागा बनवण्यासाठी वेळोवेळी डिस्क क्लीनअप आणि डिस्क फे्रग्मेंटेशन करत राहा. यामुळे सर्व फाइल्स एका जागी व्यवस्थित राहतात.

X