आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळी काळजी चेह-याची

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कडाक्याची थंडी म्हणजे ख्रिसमस, न्यू इयरचे समारंभ. आज आपण पाश्चिमात्यांच्या सर्व संस्कृती व त्यांचे सणही मोठ्या उत्साहाने साजरे करतो. हिंदू घरांमधूनही 25 डिसेंबरच्या नाताळच्या आदल्या रात्री सांताक्लॉज येऊन मुलांना भेटी ठेवून जातो. आणि आपल्याकडे जरी बर्फ पडत नसला तरी गुलाबी किंवा काही ठिकाणी कडाक्याची थंडी सुरू होते.
पूर्वी हीच थंडी दिवाळीला पडत असे. पण जगातलेच ऋतू बदलले असल्याने आता दिवाळीला पहाटेच्या आंघोळीच्या वेळी कुडकुडायला होत नाही. पण हवेतील चेह-याच्या दृष्टीने आवश्यक असलेले बाष्प (ह्युमिडिटी) मात्र कमीकमी व्हायला लागते व त्याचे दृश्य परिणाम आपल्या चेह-याच्या त्वचेवर दिसायला लागतात. हेच परिणाम जशी थंडी वाढायला लागते तसतसे तीव्र दिसू लागतात. सर्वात प्रथम त्वचेवरील चमक कमी होऊन ती राखाडी (ग्रे) दिसू लागते. नंतर त्यावर काळपट डाग पडायला सुरुवात होते. या गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर उन्हाळ्यात हेच डाग मोठे होऊन त्याचे ‘बटरफ्लाय मार्क’ एवढे मोठे होतात. म्हणजे त्वचेकडे केलेले हिवाळ्यातील दुर्लक्ष हे पुढे कायमचा दोष होऊन जाते. ओठ फुटणे हाही मोठा दोष निर्माण होतो. ओठाच्या भोवताली व हनुवटीवर काळेपणा येणे, हा तर फारच वाईट दिसणारा दोष आहे. नाकाच्या बाजूला पण अशाच प्रकारचा काळेपणा येतो. गळ्याच्या तळाशी वळ्या तर फारच काळ्या होतात.
त्वचा निस्तेज होणे, काळी पडणे व फुटणे हे दोष मुख्यत्वे त्वचेमधील बाष्पाचे म्हणजेच पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने होतात. तरुण त्वचेमध्ये नैसर्गिक तेल असते, त्यामुळे या पाण्याचे संरक्षण होते. पण जसे वय वाढत जाते तसतसे नैसर्गिक तेलाचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे त्वचेवरील पाणी पकडून धरण्याची जी शक्ती आहे ती कमी होते किंवा पन्नाशीनंतर संपूर्ण बंद होते. अशा त्वचेला डीहायड्रेटेड त्वचा असे म्हणतात किंवा सौंदर्यशास्त्रात त्याला नॅचरल मॉइश्चर फॅक्टर कमी झाला असे म्हणतात. यावर सर्वात महत्त्वाचे असे बाह्य व आंतर दोन्ही उपाय सातत्याने व्हायला हवेत. नाहीतर आॅक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत झालेले परिणाम वाढत जातात.
बाह्य उपाय : त्वचेवरील आर्द्रता वाढवणे - ही गोष्ट सौंदर्यशास्त्राच्या स्वच्छता, संरक्षण व संर्वधन - सीटीएन- क्लिन्सिंग, टोनिंग, नरिशिंग या सूत्राच्या आधारे पाहू या. या मोसमात साबण, फेसवॉश किंवा कोणत्याही अल्कली- सोडा असणा-ा प्रसाधनांचा वापर स्वच्छतेसाठी टाळला तर उत्तम. त्याऐवजी स्क्रबचा वापर करणे योग्य. ब्युटीक स्वजल व अ‍ॅलोसॅफ्रन असे दोन आर्द्रता वाढवणारे स्क्रब बनवते, त्याचे काम आहे त्वचा स्वच्छ करताना त्वचेवरील बाष्प वाढवणे व त्याचबरोबर त्यातले बारीक कण बाहेरील कोरडी त्वचा नकळत काढून त्वचेला मुलायम बनवणे. असाच चेहरा धुण्याचा कोरफडीचा स्क्रब आपण घरीही बनवू शकता. रोज आंघोळीआधी 15 ते 20 मिनिटे चेह-यावर हा स्क्रब लावून आंघोळीच्या वेळी तो चांगला घासून धुतला गेला पाहिजे. कुठल्याही साबणापेक्षा थंडीत असा साबण त्वचेला निश्चितच उपाय करत स्वच्छ करतो.
दुसरा स्वच्छतेचा उपाय म्हणजे आपण करतो ते उटणे होय. चणा डाळ - 1 भाग, उडीद डाळ 1/4 भाग, नागरमोथा पावडर व सुगंधी कचोरा दोन्ही मिळून 1/4 भाग अशी पावडर जाड दळून ठेवली तर दररोज चमचाभर पावडर दूध किंवा पाणी यामध्ये 10/15 मिनिटे भिजवून लेपासारखी लावून ठेवली व त्याने अंघोळ केली तर त्वचा स्वच्छ आणि मुलायम राहील.