आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयातील छिद्रांवर विना शस्त्रक्रिया उपचार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


माणसाच्या हृदयावर परिणाम होण्याची सर्वसामान्य कारणे म्हणजे अल्परक्तताजन्य हृदयरोग, संधिवाती हृदयरोग आणि जन्मजात हृदयरोग. अल्परक्तताजन्य हृदयरोगाबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढते आहे. संधिवाती हृदयरोगाचे प्राबल्य कमी होते आहे. मात्र दुसरीकडे जन्मजात हृदयरोगांचे प्राबल्य जगभर तसेच राहिले आहे. ते ८-10/ 1000 जन्मांमागे या प्रमाणात असल्याचे विविध अभ्यासांत नमूद करण्यात आले आहे. भारतातील 10 % बालमृत्यू दरामागे जन्मजात हृदयरोग आहे. लहान मुलांसाठी हृदयरोग सेवा भारतात अजूनही बाल्यावस्थेत आहे.

हृदयातील जन्मजात व्यंगाचे अचून निदान होऊ शकते : ईसीजी, एक्स-रे, 2 डी-इको, कार्डियाक कॅथरायझेशन आणि एमआरआय अशा विविध निदान चाचण्यांच्या शोधामुळे हृदयातील जन्मजात व्यंगाचे अचूक निदान होऊ शकते. बहुतांश जन्मजात हृदयरोग एएसडी, व्हीएसडी आणि पीडीए या हृदयातील छिद्रामुळे होतात. या व्यंगांमुळे रुग्णांना संसर्गजन्य हृदयस्तरशोथ, आवर्ती प्रजनन मार्ग संसर्ग आणि आयसेन्मेन्जरयझेशन असे त्रास होतात. म्हणून योग्य वेळी उपचार केल्यास मुलांच्या समस्या ब-या होतात. हे उच्च रक्तदाब/मधुमेह किंवा हृदय अभिशोष यावर कायमचा उपचार नाही अशा हृदयविषयक समस्यांच्या अगदी उलटे आहे.

जर हृदयातील छिद्रे अगदी लहान असतील तर उपचारांसाठी वैद्यकीय थेरपी, ओपन हार्ट शस्त्रक्रिया आणि परक्युटॅनियस कॅथेटर आधारित उपचारांचा समावेश आहे. रुग्ण तसेच डॉक्टरांकडून दुर्लक्ष, आर्थिक समस्या, रुग्णालयांची भीती आणि ओपन हार्ट शस्त्रक्रियेची भीती यामुळे बहुतांश रुग्णांवर वेळेवर उपचार होऊ शकत नाहीत.
लोकांमध्ये आणि डॉक्टरांमध्ये वाढती जागरूकता, 2 डी इकोसारख्या निदानास उपयुक्त चाचण्यांचा वापर; राजीव गांधी योजना, राष्‍ट्री य ग्रामीण आरोग्य अभियान यासारख्या विविध योजनांची सोय असताना मुख्यत: ओपन हार्ट शस्त्रक्रियेच्या भीतीमुळेच लोक उपचारांपासून दूर राहत आहेत. पण आता ही बहुतांश छिद्रांवर उपकरण वापरून शस्त्रक्रियेविनाच उपचार केले जाऊ शकतात.

कॅथेटरद्वारे हे उपकरण हृदयात बसवले जाते
अशी उपकरणे पाश्चात्त्य देशात दोन दशकांपूर्वीपासूनच वापरात आहेत. भारतात अजूनही निवडक रुग्णालयांमध्येच पण चांगल्या निष्पत्तीसह ही उपकरणे वापरली जातात. ही उपकरणे निटिनॉलपासून बनवली जातात; हा निकेल आणि टिटॅनियमचा मिश्रधातू आहे, जे मानवी शरीराला 100 % अनुरूप आहे. कोणतीही क्षती न करता ते मानवी शरीरात संपूर्ण आयुष्यभर राहतात. त्यामुळे भविष्यात कोणत्याही शारीरिक क्रियेत किंवा गर्भावस्थेत अडथळा येत नाही. ही उपकरणे शरीरात बसवल्यावर 1-६ महिने अ‍ॅस्पिरिनची थोडी मात्रा घेण्याची गरज असते. जांघेतील धमनीत एक बारीकसे छिद्र करून कॅथेटरच्या साहाय्याने हे उपकरण हृदयात बसवले जाते. यासाठी हृदय उघडणे तर सोडाच, एकही टाका घालावा लागत नाही. शस्त्रक्रिया केली तर उरोभागाला छेद द्यावा लागतो. हृदय बंद करून ते बायपास मशीनवर टाकले जाते. सामान्यत: रुग्णाला एक दिवसासाठी यांत्रिक श्वास प्रणालीवर ठेवले जाते आणि रुग्णाला 2 दिवस आयसीसीयूमध्ये ठेवले जाते. त्याला रुग्णालयातून 5 दिवसांपूर्वी सुटी दिली जात नाही. टाके घातलेल्या ठिकाणी संसर्ग होण्याची जोखीम असते. पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची गरज, जसे बायपास, हा एक मोठा मुद्दा असतो.|

काही क्लिष्टता किंवा अपयशाची शक्यता 0.5 पेक्षाही कमी
दुसरीकडे उपकरण-आधारित उपचारासाठी एक टाकाही लागत नाही. बायपासची गरज नाही. आयसीसीयूत काही तासांपेक्षा जास्त वास्तव्य करण्याची गरज नाही. उपकरण बसवल्यावर रुग्णाला दुस-या दिवशी रुग्णालयातून सुटी दिली जाते. सीएचडीच्या वैयक्तिक उपचाराची प्रकरणे पाहू या. पेटंट आर्टेरियोसस डक्टेटस म्हणजे शरीरातील दोन महा-रक्तवाहिन्यांमध्ये कायमचा संबंध. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार जिथे शक्य आहे तिथे सर्व पीडीए कॅथेटर आधारित उपचाराने बंद करावे. रुग्ण लहान मूल नसल्यास भूल देण्याची गरज नाही. ओपन हार्ट शस्त्रक्रियेसाठी लागतात तसे 3 - 4 तास न लागता या शस्त्रक्रियेला 1 तासापेक्षाही कमी वेळ लागतो. ओपन हार्ट शस्त्रक्रियेपेक्षा खर्चर्ही कमी येतो. रुग्णाला दुस-या दिवशी सुटी देता येऊ शकते. काही क्लिष्टता किंवा अपयश येण्याची शक्यता 0.5% पेक्षाही कमी आहे; ओपन हार्ट शस्त्रक्रियेपेक्षा खूपच कमी.

अलिंद पट दोष (अ‍ॅट्रियल सेप्टल डिफेक्ट) म्हणजे दोन लहान अलिंदांना वेगळे ठेवणारा पटातील दोष. ऑस्टियम सेकंडम एएसडी हा एएसडीचा सर्वसामान्य प्रकार आहे. खूप मोठे एएसडी (> 40 मिमी) आणि शरीरशास्त्रानुकूल नसलेले एएसडी वगळता, सर्व प्रकारच्या ऑ स्टियम सेकंडम एएसडीवर डिव्हाइस क्लोझर तंत्राद्वारे उपचार केले जाऊ शकतात. यासाठी रुग्णाला अत्यल्प काळासाठी सर्वसाधारण भूल द्यावी लागते. शस्त्रक्रियेसाठी अगदी दीड तासाचा अवधी लागतो; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला जवळपास चार तास लागतात. ओपन हार्ट शस्त्रक्रियेला लागतो तेवढाच अवधी या शस्त्रक्रियेला लागतो. तिस-या दिवशी रुग्णाला रुग्णालयातून सुटी मिळू शकते. काही क्लिष्टता निर्माण होण्याची जोखीम 1 % पेक्षाही कमी आहे. निलय पट दोष म्हणजे दोन निलयांना स्वतंत्र ठेवणा-या पटातील दोष. पीडीए आणि एएसडीसारखे प्रत्येक व्हीएसडी उपकरण उपचाराने बंद केले जाऊ शकत नाही. बहुतांश स्नायू व्हीएसडी आणि परिपटलीय व्हीएसडीची काही प्रकरणे उपकरण वापरून बंद केली जाऊ शकतात. अशा प्रकारे व्हीएसडी असलेल्या अर्ध्या रुग्णांवरील शस्त्रक्रिया टाळता येऊ शकते. सर्वसामान्य डॉक्टर्स आणि लोकांमध्ये योग्य पद्धतीने जागरूकता निर्माण करणे हेच आपल्याला करायला हवे. यामुळे आपल्याला लोकांवर योग्य वेळी उपचार करण्यास मदत होईल आणि त्यांना सामान्य आयुष्य जगता येईल. याद्वारे लोकांचा वैयक्तिक फायदा होईल असे नव्हे तर सगळ्या समाजाचाच फायदा होईल.

mukund28@rediffmail.com