आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्त्रीरोग आणि आयुर्वेद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला माहिती आहे की, भारतीय जनसंख्या आयोग संस्था सध्या चिंतेत आहे. कारण दरहजारी पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण कमी होत चालले आहे. दुसरीकडे त्यांचे प्रमाण कमी होत असले तरी आजारांचे प्रमाण वाढत आहे.
आज स्त्रियांना केस गळण्यापासून ते गर्भपिशवी काढण्यापर्यंत वेगवेगळ्या आरोग्य समस्यांतून जावे लागते. तेव्हा विचार करण्याची वेळ आली आहे. असे आजार यापूर्वी होते काय? तर तुमच्या लक्षात येईल की, तुमची आई, सासू आणि आजी यांच्यात आजारांचे प्रमाण कमी होते. आयुर्वेदानुसार आरोग्याचे काही नियम नित्यनेमाणे पाळावेत.
सकाळी लवकर उठावे. लघवी-शौचास, अपानवायू (गॅस) यांचे नैसर्गिक वेग अडवू नयेत. कामाच्या घाईमुळे, वेळेअभावी, लज्जास्तव अथवा अन्य सुविधांच्या अभावामुळे स्त्रियांना नैसर्गिक वेग अडवण्याची सवय असते. याचे दूरगामी वाईट परिणाम होतात.
सकाळी उठल्यावर अथवा चहापूर्वी पाणी पिणे, जेवताना, जेवणानंतरही भरपूर पाणी पिणे टाळावे. त्यामुळे वजन कमी होईल. वाढलेले वजन कमी करण्यासाठी शेकडो उपाय करावे लागतात. त्यापेक्षा स्नेहवेदन आणि लेखन बस्तीचा वापर केल्यास कमी होते. दिवसा झोपू नये. त्यामुळे कफाचे आजार वाढतात. जडपणा येतो. आळस वाढतो आणि आमवात होऊ शकतात. रात्रीचे जेवण लवकर करावे. शक्यतो जेवण नेहमी ताजे आणि सुपापासून बनवलेले असावे.
फिरण्यासाठी अथवा कोणताही व्यायाम नियमितपणे करावा. पाळी लवकर येणे, उशिरा येणे यासाठी डॉक्टरांनी गोळी देणे टाळावे. काही धार्मिक कार्यक्रम अथवा प्रवासात निघताना अशा गोळ्या घेऊ नयेत. निसर्गाच्या चक्रात फेरफार करणे गुन्हा आहे. त्याची शिक्षा निसर्गाकडून मिळणारच. प्रसूतीच्या वेदनेपासून सुटका करण्याची अनेक स्त्रियांचा कल सिझेरियन करण्याकडे असतो. त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. लहान मुले अंगावर पितात, परंतु फिगरच्या फॅडमुळे दूध पाजणे लवकर बंद करण्याचे प्रमाणही वाढते आहे. त्यासाठी हार्मोन्सच्या गोळ्याचा वापर होणे शक्य आहे. त्याचा संपूर्ण फिजिऑलॉजीवर दुष्परिणाम होतो.
शेवटचे आणि महत्त्वाचे म्हणजे गर्भपाताचे वाढते प्रमाण. गर्भनिरोधक साधने वापरण्यामध्ये अनुत्साह असतो. त्यापायी गर्भधारणा होते. त्यानंतर गर्भपात करवला जातो. नियमित अ‍ॅबॉर्शन करणा-या स्त्रियांची अनेक उदाहरणे आहेत. यात हिंसा, पाप, प्रज्ञापराध याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. गर्भापात म्हणजे छोटा प्रसव असतो. त्यामुळे बस्ती चिकित्सा करून घेणे, दशमुलारिष्ट औषध किमान सहा महिन्यांपर्यंत घेणे आवश्यक आहे. स्त्रिया खूप भावनिक असतात. त्यांना मानसिक आजाराची लागण लवकर होते. सर्व शारीरिक व्याधी दूर ठेवण्यासाठी प्रत्येक स्त्रीने स्वत:चे मनोबल वाढवून आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा.