आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भावस्था व आरोग्याची काळजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गर्भावस्था म्हणजे एका स्त्रीकडून एका आईकडे जाण्याचा प्रवास. तोही साधासुधा नव्हे, म्हणजे चक्क 9 महिने 9 दिवस. आपले शरीर ही आपल्याला लाभलेली एक दैवी देणगी आहे, परंतु या अमूल्य शरीरासाठी आपल्याला काहीच किंमत द्यावी न लागल्याने आपण त्याची किंमत करत नसतो. मात्र, गरोदरपणात याच शरीराच्या माध्यमातून आणखी एक नवीन शरीर जन्म घेणार असते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने गर्भावस्थेमध्ये आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.


एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की, 80 टक्के रोग हे फक्त पचनसंस्थेत बिघाड झाल्यामुळे होतात.
गर्भावस्थेत शारीरिक बदलांचा महिलांच्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो. या दिवसांत अनेक महिलांच्या शरीराची त्वच्या चमकदार होते.


गर्भावस्थेत आरोग्यावर होणा-या बदलांचे मूळ कारण शरीरात रक्त संचाराचे घटणे, वाढणे, एस्ट्रोजनच्या प्रमाणात असंतुलन होणे. त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. त्याकरिता खालील प्रकारे काळजी घ्यावी.
* उत्कृष्ट पचनसंस्था व दातांचे आरोग्य सांभाळणे (सकाळी व रात्री असे दिवसातून 2 वेळेस ब्रश करणे)
* सक्षम श्वासोच्छ्वास (मोकळा श्वास घेणे)
* पर्याप्त रक्ताभिसरण (सकाळी 5 ते 7 व रात्री शतपावली चालणे.)
* शरीरातील विषारी द्रव्यांचे उत्सर्जन (नियमित रोज सकाळी वेळेवर शौचास व लघवीला जाणे. शौच व लघवी कधीही दाबून ठेवू नये, अन्यथा किडनीवर दबाव येतो.)
* आयुर्वेदिक औषधींच्या नियमित सेवनाने शरीरातील सातही धातू पुष्ट करणे, तिन्ही दोषांचे संतुलन राखणे.
* गर्भावस्थेत सनस्क्रीन लोशनचा वापर जरूर करावा (बाहेर उन्हात जात असाल तर.)
* गर्भावस्थेदरम्यान त्वचा खूप तेलकट होते. त्यामुळे या दिवसांत जास्तीत जास्त त्वचा नियमितपणे स्वच्छ ठेवणे.
* गर्भावस्थेत त्वचा जास्त कोरडी होत असेल तर तेलयुक्त मॉइश्चरायझर अथवा क्रीमचा वापर करावा
* गर्भावस्थेत नियमितपणे 3 ते 4 लिटर दिवसभरात किंवा कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी पिलेच पाहिजे.
* गर्भावस्थेत रात्री झोपण्यापूर्वी डोके किंवा शरीराची मालिश केल्याने स्नयूंना आराम मिळतो व गाढ झोप लागते.