आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काव्य महायज्ञ: जागतिक विक्रमाची कविता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कविता म्हटलं की अनेकांच्या कपाळावर अाठ्या येतात, कवी दिसला की तिथून पळच काढला जाताे असे म्हणतात पण एकिकडे ही स्थिती असताना दुसरीकडे तब्बल एक हजार ते बाराशे कवी एकाच छताखाली येतात अाणि अखंड ७६ तास काव्यहाेत्र तेवत ठेवतात तेव्हा नक्कीच कवितेला स्वत:चे अस्तित्त्व असल्याचे सिद्ध हाेते. गाेवा कला अकादमी अाणि गाेवा सरकारच्या वतीने हे काव्यहाेत्र गेल्या दाेन वर्षांपासून सुरू अाहे. गेल्या वर्षी ५२ तास तर यंदा तब्बल ७६ तास अखंड काव्यवाचानाचा प्रवाह सुरू ठेवत पूर्वीच्या ७० तास काव्यवाचनाचा विक्रम या कार्यक्रमाने मागे टाकला अाहे. फक्त कविने स्टेजवर यायचं अापली कविता वाचायची अाणि जायचं असं याच स्वरुप नव्हतं तर कवितेतील विविधता शाेधत काव्य क्षेत्र समृद्ध करण्याचं माेठ काम या मंचावर हाेत हाेतं. हा सगळा अट्टाहास कशासाठी असा प्रश्न निर्माण हाेणं सहाजिक अाहे. तर अायाेजक गाेव्याच्या विधानसभेचे उपसभापती विष्णू सूर्या वाघ हे स्वत: कवी, लेखक अाहेत. विविध ठिकाणी ते अाजही कवितावाचनाचे कार्यक्रम करतात. त्यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या कान्याकाेपऱ्यात अत्यंत संवेदनशील कवी दडलेले अाहेत पण त्यांना मंच मिळत नाही. त्यांचे काव्य, वेदना, संवेदना, भूमिका त्यांच म्हणणंं मुख्य प्रवाहात येतच नाहीत. अशा कवींसाठी अापण काहीतरी केलं पाहिजे म्हणून गेल्या वर्षी ही कल्पना सुचली अाणि यंदातर विक्रमी कविता सादर झाल्या. समाजाचा अारसा म्हणजे काव्य, समाजाचं प्रतिबिंब म्हणजे काव्य हे या ठिकणी क्षणाेक्षणी अधाेरेखीत हाेत हाेतं.
सामान्य कवी येताे कविता सादर करून जाताे त्याला दादही मिळते असे तर हाेतेच पण इथे सेशनवाईज कविता सादर झाल्या. त्या म्हणजे दिग्दर्शकांच्या कविता, कलाकारांच्या, पत्रकारांच्या, चित्रकारांच्या, नाटकातील, पावसाच्या , गझल, कवितांची गाणी, ज्येेष्ठ कवींच्या कविता, दिवंगत कवींच्या कविता, अाग्री, नगरी, मणिपुरी, तमिळ, कन्नड, हिंदी, इंग्रजी, मराठी, काेकणी, मालवणी अशा विविध सेशनमध्ये कवितांचा पाऊस मांडवी किनारी पडत हाेता अाणि रसिक चिंबचिंब भिजत हाेते.

एखाद्या कथा-कादंबरीपेक्षा कविता ही कधीही प्रभावी असते. कथा-कादंबरीच्या असंख्य पानांमध्ये जे सांगितलं जातं ते कवितेच्या एका पानात उमटतं एवढी प्रतिभा कवितेत अाहे. म्हणूचन काव्यहाेत्र सारखे उपक्रम महत्त्वाचे ठरतात. पण मग ‘र’ ला ‘र’ अाणि ‘ट’ ला ‘ट’ अशा कविता सादर हाेतच नाहीत का? तर अशाही कवितांना येथे व्यासपीठ हाेतेच. कारण अाज अशा कविता सादर करणारे कवीच उद्या यातून काहीतरी शिकून वेगळी कविता लिहतील हाच उद्देश हाेता.

अाता अशा कार्यक्रमांमध्ये रुसवे-फुगवे नसतात असे म्हटले तर ती अतिशयाेक्ती ठरेल. येथेही अनेक कविंना कविता सादर न करताच माघारी यावे लागले. देवळात जसे काही बडवे असतात तसे या ठिकाणीही हाेते. म्हणजे अापल्या अाेळखीतले, अापल्या जवळच्या लाेकांना चांगले सेशन देणे, त्यांना चांगल्या कवींमध्ये बसवणे, अापणच सारखे-सारखे स्टेजवर जाणे असे काहीजण हाेतेच. त्याचा काही कविंच्या मनावर नक्कीच परिणाम झाला. पण मुळ उद्देश हाेता ताे कविता सादर करण्याचा. त्यामुळे अशा लहान-सहान गाेष्टींकडे अनेकांनी दुर्लक्ष करत दिवस-रात्र कविता सादर करून कवितेचे हे काव्यहाेत्र तेवत ठेवल्यानेच लिम्का बुक अाॅफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये त्याची नाेंद हाेणार अाहे. विशेष म्हणजे लिम्काच्या प्रतिनिधींनी इथे संवाद साधताना स्पष्ट केले की, मला भाषा कळतन पण भावना कळतात अाणि कवितेसाठी एवढे माेठे काम सुरू अाहे हे बघून अाश्चर्य वाटते अाहे. यंदापासून तर राष्ट्रीय काव्यहाेत्र अाणि काव्यहाेत्र सन्मान पुरस्कारही देण्यात अाले अाहेत. त्यामुळे कवितेचे हे मंथन अाता एका वेगळ्याच उंचीवर गेले अाहे. यंदाचा पहिला पुरस्कार रामदास फुटाणेंना का? असा प्रश्नही येथे अनेक कविंनी उपस्थित केला. पण फुटाणेंनी गेल्या ३० वर्षांपासून चालवलेली कवितेची चळवळ अाणि कान्याकाेपऱ्यातील कवींना शाेधून समाजापुढे अाणण्याचे माेठे काम केले अाहे. शिवाय पहिलाच पुरस्कार म्हणून मराठी भाषेला देण्यात अाला अाहे. हा काव्य गाैरव असाच अखंड सुरु रहावा हीच सर्व कवींची इच्छा अाहे. त्यामुळेच तर पुढली वर्षांच्या काव्यहाेत्रची प्रतिक्षा कविंना अाहे. एखाद्या साहित्य संमेलनाला लाजवले असे हे राष्ट्रीय कवि संमेलन. ना विषयाचे बंधन, ना सादरीकरणारचे बंधन असे जरी असले तरी काेणत्या कवितेला दाद द्यावी हे रसिकांना कळत हाेते. अाता यातून खरंच किती कवी
निर्माण हाेणार हा जरी प्रश्न असला तरी ही एक प्रक्रिया सुरू झाली अाहे. दाेनच वर्षे झाले अाहेत अाणखी बराच टप्पा गाठायचा अाहे. त्यामुळेच कवितेची ही ज्याेत तेवत ठेवण्याची जबाबदारी अाता सगळ्यांचीच अाहे.
बातम्या आणखी आहेत...