आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीच्या आहारामुळे आम्लपित्त

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल आम्लपित्त किंवा ‘अ‍ॅसिडिटी’ हा परवलीचा शब्द झाला आहे. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो. चुकीचा आहार व बदलत्या जीवनशैलीमुळे आम्लपित्ताचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.
कारणे
तिखट व मसालेदार पदार्थांचे सेवन करणे, आंबट-आंबवलेले व शिळे पदार्थ खाणे, मानसिक तणाव, जेवणाच्या वेळा नियमित नसणे, रात्री जागरण, मद्यपान, धूम्रपान, तंबाखू सेवन, सतत धावपळीची जीवनशैली या सर्व कारणांमुळे अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही. ही कारणे चालूच राहिल्यास आम्लपित्ताचा त्रास हळूहळू वाढू लागतो.
लक्षणे
सुरुवातीला आंबट व तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर पोटात व छातीत जळजळ होणे, घशाशी आंबट पाणी येणे, डोकेदुखी, अपचन ही लक्षणे निर्माण होतात. त्रास अधिकच वाढल्यावर उलट्या होतात. अनेकांना उलटी झाल्यावर बरे वाटते. त्यामुळे अनेक जण स्वत:हून उलटी करतात.
हे करावे : तूप, साखर, लोणी हे पदार्थ खाण्यात असावेत. दोडका, भेंडी, कोबी, फुलकोबी, भोपळा, आमसुलाची चटणी, कोहळा हे पदार्थ खाण्यात असावेत. मेथी, पालक या भाज्या पित्त वाढवणाºया असल्याने त्या कमी प्रमाणात खाव्यात. तुरीऐवजी मुगाच्या डाळीचे वरण असावे. डाळिंब, मनुका, आवळा, अंजीर फळे खाण्यात असावीत. जेवण वेळेवर करावे.
हे करू नये : तिखट, आंबट, मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. आंबवलेले पदार्थ खाणे, चहा-कॉफी घेणे, रात्री जागरण करणे, धूम्रपान, मद्यपान टाळावे. गरजेपेक्षा जास्त पाणी पिऊ नये.
उपचार
आयुर्वेदामध्ये आम्लपित्तासाठी प्रभावी औषधी उपलब्ध आहेत. सूतशेखर, कामदुधा ही औषधी आम्लपित्तावर अत्यंत गुणकारी आहे. याशिवाय शतावरी, ज्येष्ठमध, आवळा, भूनिंब या वनस्पतींचा पित्त संतुलनासाठी चांगला उपयोग होतो. वैद्यांच्या सल्ल्याने वमन, विरेचन ही पंचकर्मे केल्यास आजाराचा समूळ नाश होऊ शकतो.