आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘झेवियर’चा मराठीतून विशेष मीडिया अभ्यासक्रम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्रकारिता म्हणजे निव्वळ बातमीदारी या संकल्पनेच्या पुढे जाऊन, तरुणांच्या खांद्यावर थेट कॅमेरे देऊन त्यांना डबिंगपासून सूत्रसंचालनापर्यंत अनेक नवनव्या संकल्पनांची जाणीव करून देणारा अभ्यासक्रम ‘झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्स’ (एक्सआयसी) या मुंबईतील प्रख्यात संस्थेतर्फे गेली 15 वर्षे मराठी भाषेतून सुरू आहे. पत्रकारितेबरोबरच जाहिराती, डबिंग, सूत्रसंचालन, चित्रपट रसग्रहण, टीव्ही चॅनल अँकरिंग आणि तसेच रेडिओ निवेदन आदी माध्यमात करिअर करू इच्छिणाºयांसाठी या संस्थेतर्फे विविध अभ्यासक्रम राबवले जातात.

प्रसामाध्यमात काम करत असलेल्या जाणकारांचे थेट प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन हे ‘झेवियर’च्या या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य आहे. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून, हा अभ्यासक्रम बारावीनंतरही करता येऊ शकतो.
इच्छुकांनी झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्स, सेंट झेवियर्स कॉलेज, महापालिका मार्ग, मेट्रो सिनेमाजवळ, मुंबई 400 001 येथे संपर्क साधावा. फोन : 022-22621366, 22621639. www.xaviercomm.org
‘एक्सआयसी’च्या वेबसाइटवर नोंदणीचा अधिक तपशील व संस्थेची माहिती उपलब्ध आहे.