आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yamini Kulkarni Story About Workers In Mat Factories

चटया सजवणारे हात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणी पाहुणा आला की बसायला, दुपारची वामकुक्षी घ्यायला गवती चटईच वापरली जाते आपल्याकडे अजूनही. नक्षीदार, विविधरंगी चटईला आकर्षक करणारे हात प्रचंड मेहनती. सुंदर घरोब्यात राहून मुलांना शिक्षण देऊन पायावर उभं करण्याचं स्वप्नही याच चटईसोबत विणलं जातं...

महिलांच्या नशिबी नेहमीच दु:ख असते अाणि महिलांनाच झिजावे लागते असे म्हटले जाते; परंतु महिला या सगळ्या परिस्थितीतून स्वत:ला सावरतात अाणि अानंदाने अापले अायुष्य जगतात. नेहमी चेहऱ्यावर हसू अाणि अागत्याचे भाव असलेल्या महिलांना काेणतेही काम दिले तरी त्या मागे हटत नाही. लाल, पिवळी, हिरवी, निळी अशा अनेक रंगांनी खुललेली चटई अापल्या प्रत्येकाच्या घरात असतेच. जळगावात चटई उद्याेग माेठ्या प्रमाणात विस्तारलेला असून जळगाव एमअायडीसीत अनेक चटई कंपन्या अाहेत. या कंपन्यांमध्ये माेठ्या प्रमाणात महिला कामगारांचा समावेश अाहे. चटईची फिनिशिंगपासून ते फायनल टच देण्याचे संपूर्ण काम महिला करतात. झाेपायला अारामदायी अाणि दिसायला अाकर्षक असणारी ही चटई प्रत्येक घरात पाहायला मिळते. सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत शहराच्या जवळील अनेक गावातून तसेच काॅलन्यांमधून या महिला इथे कामास येतात. चटईला फिनिशिंग देण्यासाठी ब्लेडचा वापर केला जाताे. या ब्लेड अनेकदा हाताला लागतात; परंतु माघार न घेता, दु:ख सहन करत मुलांच्या उत्तम भविष्यासाठी या महिला काम करत अाहेत. दिवसभरातून ५०० चटयांचे फिनिशिंग एक महिला करते. चटईतील डिफेक्ट, साइड कटिंगसारखे काम त्यांना करावे लागते. काय म्हणतात या कामगार?

छाया मधुकर जाधव
जळगावच्या जवळीलच कुसुंबा गावातून या महिला कामास इथे येतात. गेल्या अाठ वर्षांपासून सातत्याने छाया इथे येत अाहेत. त्यांचा मुलगा बारावीत असून मुलगी नववीत शिकते. पतीदेखील मजुरी काम करतात. सगळ्या शरीराला त्रास असताे. रात्री घरी गेल्यानंतर शरीरातील प्रत्येक भाग दुखत असताे. अाजारी असतानाही अनेकदा काम करताे. मुलांचे अायुष्य चांगले व्हावे यासाठी काम करावेच लागेल. पण अाम्हीदेखील मजुरी किती दिवस करणार? अाम्हालासुद्धा समजून घ्यायला हवे समाजाने, असे त्यांनी सांगितले.

सुवर्णाबाई धनराज माेरे
गेल्या २ वर्षांपासून चटई कारखान्यात काम करतेय. एक मुलगा अाणि मुलगी असून पती चटईचे माेठे बाॅक्स गाडीत भरण्याचे हमाली काम करतात. दाेघांचा जेमतेम पगार असताे. जीव खूप थकूनही दुसऱ्या दिवशी कामाला यावेच लागते. राेजाप्रमाणे पैसे असल्याने एक दिवस रजा झाली तर पैसे कापले जातात. त्यामुळे काम केल्याशिवाय पर्याय नसून यातच अानंद मानत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

संगीता मराठे
४ वर्षांपासून त्या कारखान्यात काम करताहेत. दाेन मुले असून एक इंजिनिअरिंगच्या डिप्लाेमाला, तर दुसरा नववीत अाहे. पतीचे निधन झाले असल्याने संगीता यांच्यावरच घराची संपूर्ण जबाबदारी अाहे. पण कितीही अडचणी येवाे, मुलाला इंजिनिअर बनवायचे अाहे. यासाठी दाेन कामं अजून करेल, पण त्याला काही तरी माेठे शिक्षण देईन, असा चंगच त्यांनी
बांधला आहे.

हिरादेवी िमथलेश झा
मूळ बिहारमधल्या हिरादेवी गेल्या २५ वर्षांपासून जळगावात स्थायिक अाहेत. त्यांना दाेन मुलगे, एक मुलगी अाहे. मुले शिकतात अाणि त्यांना माेठे झाल्यावर हे काम करावे लागू नये म्हणून त्या व त्यांचे पती कष्ट करतात. रेाजंदारीवर दाेघेही काम करत असल्याने ज्या दिवशी कामाला जाऊ त्या दिवशी खाऊ, नाही तर अडचणीत दिवस जात असल्याचे त्या सांगतात. भाड्याची खोली असून कमाई करणे अत्यंत जरुरी अाहे. पण मुलांना कसेही करून शिकवायचे अाहे. त्यांचीसुद्धा इच्छा अाहे अाणि मी पतीला हातभार नाही लावणार तर मग काेण लावेल, असेही त्या म्हणतात.

yamini.kulkarni@dbcorp.in