आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yamini Kulkarni Article A Bout Palnagahre, Care Taker

चांगली व्यक्ती घडवण्याचं समाधान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'जळगावातील अनेक मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आई・बनून सांभाळली आहे वैशाली देव यांनी. शिव कॉलनी परिसरात 1990 मध्ये दोन मुलांपासून त्यांनी पाळणाघराची सुरुवात केली.'

पाळणाघर ही संकल्पना अनेकांना न पटणारी असते. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात अनेक जण याबाबतीत खूप नकारात्मक विचार करायचे. परंतु घरातल्या दोन्ही व्यक्ती कमावणार्‍या असतील तर नक्कीच हा पाळणाघराचा पर्याय त्यांच्यासाठी सोयीचा होता. पाळणाघराची संस्कृती आल्यापासून त्या धावपळ करणार्‍या, कष्टाने संसाराचा गाडा ओढणार्‍या कुटुंबाला थोडा आराम मिळाला. पाळणाघरातील मुलांना संस्कार नसतात, त्यांना आपलेपणा मिळत नाही, आईविना पोर राहून जाते असे अनेक प्रश्न समाजच पालकांना करत असतो. परंतु कोणी हा विचार करीत नाही की एकाच छताखाली एकाच वेळेस जवळपास एकाच वयाची अनेक मुले सांभाळताना त्या बाईची काय अवस्था होत असेल. लहान मुलांवर जीव लावायचा आणि ती मोठी झाली की निघून गेल्यावर एकटेपणाचा सामना करायचा हे त्या पाळणाघर चालवणार्‍या आईसाठी किती कठीण असते. हा भावनांचा खेळ नेहमी ती खेळत असते.
जळगावातील अनेक मुलांच्या संगोपनाची जबाबदारी चोखरीत्या ‘आई’ बनून सांभाळली आहे वैशाली देव यांनी. शहरात अनेक वर्षांपासून त्यांचे पाळणाघर शिव कॉलनी परिसरात आहे. 1990 मध्ये दोन मुलांपासून त्यांनी पाळणाघराची सुरुवात केली. त्यांचे पती खान्देश मिलमध्ये नोकरीस होते. मिल बंद पडल्यानंतर ते खासगी नोकरी करू लागले. संसारास हातभार लागावा, मुलांची योग्य शिक्षण व्हावे या उद्देशाने त्यांनी पाळणाघराची सुरुवात केली.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा सविस्तर लेख....

(yamini.kulkarni@dainikbhaskargroup.com)