आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yamini Kulkarni Article About Sexual Harassment At Workplace

'तिच्या'च सोबत ड्यूटी हवी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्य परिवहन महामंडळात वाहक म्हणून अनेक महिला हल्ली काम करतात. या महिला कंडक्टर्सना अनेक ठिकाणी बाहेर जावे लागते. त्यांना प्रवासी तर त्रास देतातच, परंतु बसचालकांचाही उपद्रव होतो. एका चालकास एक वाहक महिला आवडायची. त्याचे लग्न झालेले, या महिलेचादेखील संसार होता. तरीही तो तीच वाहक म्हणून आपल्या बसमध्ये हवी असा आग्रह करायचा.
बसच्या ड्यूटी लावणा-या अधिका-यास सक्ती करायचा की मला ती वाहक साथीदार म्हणून नाही मिळाली तर मी तिला त्रास देईन, मी येणार नाही. त्याची ही मागणी वाढतच गेली. ही बाब तेथील वरिष्ठ अधिका-यांना कळली. तेथील महिला अत्याचार समितीकडे त्या महिलेने तक्रार केली. त्यानंतर त्या तक्रारीची गोपनीय चौकशी करून त्या चालकास तंबी देऊन त्याची बदली करण्यात आली.
प्रवाशांकडून साथ अपेक्षित...
महिला वाहकांशी संवाद साधला असता अनेक घटना त्यांनी सांगितल्या. अनेकदा महिला वाहकांशी प्रवासी विविध कारणांवरून वा विनाकारण वाद घालतात. एका प्रसंगी वाद घालणा-या प्रवासी महिला आणि पुरुषाने महिला वाहकाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चालकास वाहक सांगत होती की पोलिस स्टेशनला गाडी घेऊन जा. परंतु त्यानेही ऐकले नाही आणि सहप्रवासीही गप्पच बसले होते. अन्य एका घटनेत, एका प्रवाशाने महिला वाहकाची तिकीट पेटी फेकून देत तिचा हात धरून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तेव्हादेखील इतर प्रवाशांनी बघ्याची भूमिका घेतली.
असे अनेक प्रसंग वारंवार या महिला वाहकांसोबत प्रवासादरम्यान घडताहेत; परंतु माणुसकी म्हणूनदेखील प्रवासी तिची मदत करत नाहीत.