Home »Magazine »Akshara» Yashpal Servade Article On Dalit Sahitya

दलित साहित्याला शिथिलता आली

यशपाल सरवदे | Apr 24, 2012, 23:04 PM IST

  • दलित साहित्याला शिथिलता आली

1970 ते 2000 पर्यंत दलित साहित्यामध्ये आक्रमकपणा होता. हा आक्रमकपणा हरवून साहित्यामध्ये शिथिलता आली आहे. आजच्या दलित साहित्यात ग्रामीण भागातले चित्रण होत नाही. शिकून गुणवत्तेवर पुढे जाणारा दलित समाज हे शहरी भागातले चित्र असले तरी ग्रामीण भागातील समाजात जागरूकता येण्यासाठी समाजातले प्रश्न समजून घेऊन त्याची साहित्यामध्ये मांडणी झाली पाहिजे. अलीकडे साहित्य चळवळ लोप पावत चालली आहे. आंबेडकरी, विद्रोही अशी साहित्य संमेलने होत असली तरी दलित साहित्यात संपूर्ण समाजाचे जोरकस-आक्रमकपणे वास्तवदर्शी चित्र आजकाल प्रतिबिंबित होताना दिसत नाही.
दलित साहित्य व चळवळीची सुरुवात जनआंदोलनातून झाली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाही आम्ही आंदोलन केले. अलीकडे दलित नेत्यांनी स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी राजकारणाचा वापर सुरू केला आहे. स्वार्थासाठी कधी आघाडी, कधी महायुती केली जाते. चळवळीमुळे समाजाचे प्रश्न सुटले. मात्र स्वार्थी राजकारणातून प्रश्न सुटू शकणार नाहीत. आता आंबेडकरी विचारांच्या युवकांनी दलित चळवळ निर्माण केली पाहिजे. शिथिलता आलेली साहित्य चळवळ पुन्हा उभी राहिली पाहिजे. नामदेव ढसाळ, डॉ. पानतावणे यांच्यासारख्या साहित्यिीकांनी समाजाला साहित्यातून संदेश देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. अस्मितादर्शच्या रुपात ही साहित्य चळवळ डॉ. पानतावणे यांनी सुरु ठेवली आहे. साहित्यिकांचा समाजावर प्रभाव हवाच. ग्लोबलायझेशनच्या काळात मागे पडलेली, पिचलेली दलित साहित्य चळवळ ग्रामीण भागातील समाजाच्या सुधारणेसाठी पुन्हा नव्याने उभी राहिली पाहिजे. नाही तर यांच्या संवेदना-भावनांना, प्रश्नांना कोणी वाचा फोडणार नाही. ते पुन्हा मागे जातील.
- शब्दांकन : चंद्रसेन देशमुख

Next Article

Recommended