आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मी निर्णय घेऊ शकते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुमच्या एकंदर व्यक्तिमत्त्व विकासात निर्णयक्षमता वाढविणे अतिशय गरजेचे आहे. अनेक स्त्रियांमध्ये निर्णयक्षमतेचा नैसर्गिक अभाव असतो. एखादी उच्चविद्याविभूषित स्त्रीदेखील तिच्या आयुष्यातील लहानसहान निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकत नाही हे पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. निर्णयक्षमता नसणं ब-याचदा तिच्या पालनपोषणाच्या वेळी तिला पालकांनी किती प्रोत्साहन दिलं आहे यावरही अवलंबून असतं. तर काही वेळा त्यात मानसिकतेचा भागही असतो. पालक बरेचदा विशेषत: मुलींच्या संगोपनाचे वेळी त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य लहानपणापासूनच देत नाहीत. तू थांब, तुला काय कळतंय असं बोलून तिची नैसर्गिक निर्णयप्रक्रिया थांबवली जाते ती सुरुवातीला पालकांकडूनच. लहानपणापासूनच निर्णय न घेता आल्याने किंवा तशी मोकळीक न मिळाल्याने मुली आपोआपच मोठेपणीही निर्णयासाठी कोणावर तरी अवलंबून राहतात. शिक्षणक्षेत्राची निवड, कपड्यांच्या फॅशन्सची निवड, ब्यूटीपार्लरची निवड, या व अनेक लहानमोठ्या गोष्टींचे निर्णय त्या स्वतंत्रपणे घेऊ शकत नाहीत. इथे समस्त स्त्रीवर्गाला माझे एकच सांगणे आहे की आपण घेतलेला निर्णय हमखास चुकेल या भयगंडातून तुम्ही सर्वप्रथम बाहेर यायला हवं. निर्णय चुकला तर चुकूदे, हरकत नाही. पण निदान त्या चुकलेल्या निर्णयातून तुम्हाला स्वतंत्र निर्णय घेण्याची सवय लागेल. निर्णयप्रक्रिया तशी फार जटिल नाही किंवा नसते.


सुरुवातीला अगदी लहान निर्णयांपासून सुरुवात करून पाहा. उदाहरणार्थ, स्वत:च्या कपड्यांची खरेदी करायला एकट्या जा. सोबत मैत्रीणही नको आणि नवराही नको. शोरूमला जा, तुम्हाला जो ड्रेस मनापासून आवडतोय तो बिनदिक्कत खरेदी करा, घरी या आणि घालून पाहा. लोकांना तो आवडेल की नाही याचा विचार करू नका. (तुम्ही ड्रेसची खरेदी करायला ज्याला बरोबर घेऊन जाताय त्याची पसंती ही काही जागतिक पसंती नसतेच मुळी.) तुमची आवड आणि पसंती ही जास्त महत्त्वाची असते. हेच एकदा ब्यूटीपार्लर, फर्निचरची खरेदी किंवा जनरल शॉपिंगला जातानाही करून पाहा. हळूहळू सवय लागेल.
क्रमश: