आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगासने आणि व्यायाम तुलना, योगासनांमध्ये शक्तिसंचय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योग अंगीकारल्यास जीवनातील दैनंदिन प्रश्नांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी मनोबल प्राप्त होते.


आरोग्य, मन:शांती, व्यक्तिमत्त्व विकास, नैतिकता अशा सर्वांगीण उन्नतीसाठी व बौद्धिक विकासासाठी योग आवश्यक आहे. एक म्हणजे तो एक व्यायाम प्रकार वाटतो. योग या विषयाकडे अशा रीतीने, नजरेने वरवर पाहिले जाते. योग हा व्यायामप्रकार वाटणे साहजिक आहे. कारण अासनांचा अभ्यास करताना आसनस्थिती घेताना व सोडताना हालचाली कराव्या लागतात. या हालचाली अनिवार्य आहे. याच हालचालींना अतिरिक्त महत्त्व दिल्यामुळे योग अभ्यासाला आपण व्यायामाच्या मोजपट्टीने मोजतो. मग सामान्य माणसांचा इथेच गोंधळ उडतो.
व्यायाम म्हटले की तो करण्याचा कंटाळा येतो. म्हणून पूर्वी याला उपासनेची जोड दिली जात असे. उपासनेला अाध्यात्मिकतेचे अधिष्ठान असल्यामुळे कृतीत नियमितता सहज येते. त्यामुळे योगासनांना व्यायाम समजणे किंवा व्यायाम प्रणालीशी तुलना करणे चुकीचे आहे. योगासनांची तुलना व्यायाम प्रणालीशी केली असता त्यातील योगच नाहीसा होतो. तेव्हा दोन्ही प्रणालीचा मूलभूत व पुरेसा अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करताना कोणती प्रणाली श्रेष्ठ वा कनिष्ठ हे ठरवायचे नाही. तो उद्देशही नाही. या दोन्ही स्वतंत्र प्रणालीचा अभ्यास केला, तर दोन्ही प्रणालीसाठी उपयुक्त राहील. योग विद्याधाम गुरुकुल नाशिकचे कुलगुरू विश्वास मंडलिक गुरुजी यांनी योग व व्यायाम या दोन्ही प्रणालीमधील फरक सुरेख समजवला आहे. ते आपण पाहूया. व्यायाम प्रणालीमध्ये जलद व गतिमान हालचालींना महत्त्व आहे, तर योगासांमध्ये संथ, सावकार व नियंत्रित हालचालींना महत्त्व आहे. या दोन्ही प्रणालीमधील या मूलभूत फरकामुळे पुढे त्याच्या परिणामात देखील फरक पडतो. तो कसा पाहूया.
व्यायाम
१. जलद व गतिमान हालचालीमुळे शक्तीचा अपव्यय होतो.
२. व्यायामानंतर थकवा निर्माण होतो. विश्रांती घ्यावी लागते.
३. पौष्टिक आहार घ्यावा लागतो.
४. व्यायाम प्रणालीमध्ये व्याधींवर उपचारात्मक उपयोग करता येत नाही.
५. मध्यम व पौढ व्यक्तींना पेलवत नाही.
६. व्यायाम विशिष्ट ऋतूत, हिवाळ्यात करता येताे. इतर ऋतूत टाळावा लागतो.
७. व्यायाम प्रणालीत केवळ शारीरिक स्तरांवर विकास.
८. साधनांची आवश्यकता लागते व त्यावर खर्च करावा लागतो.
९. स्नायूंचे संवर्धन होते, मात्र ते ताठर बनतात.
१०. शारीरिक क्षमता वाढते व ताणतणावांवर नियंत्रण मिळवता येते.
योगासने
१. संथ, सावकाश व नियमित हालचालीमुळे शक्तीचा संचय होतो.
२. आसनांमुळे स्फूर्ती व उत्साह वाढतो. विश्रांतीची आवश्यकता भासत नाही.
३. पौष्टिक आहार असेल किंवा नसेल तरी काही फरक पडत नाही.
४. आसनांचा उपयोग व्याधींवर उपचारात्मक म्हणून.
५. मध्यम पौढ व अतिवृद्ध व्यक्तीसुद्धा अभ्यास करतो.
६ प्रत्येक ऋतूत योगअभ्यास करता येतो. अभ्यास कमी करण्याची गरज नाही.
७. योगाभ्यासात शारीरिक, मानसिक, बौद्धिक या तिन्ही स्तरावर विकास होतो.
८. साधनच लागत नाही, म्हणून खर्चही होत नाही.
९. स्नायू बळकट व लवचिक होतात.

(लेखक हे प्रशिक्षित योग शिक्षक आहेत)
drhemant@hotmail.com