हे बसून करावयाचे आसन आहे. प्राणायाम व ध्यानधारणेसाठी हे उपयुक्त आसन आहे.
कृती : १. स्वच्छ सतरंजी अथवा चटईवर बसावे.
२. उजवा पाय गुडघ्यात मुडपा व डाव्या मांडीवर टाचा ओटी पोटाशी चिकटून जांघेत ठेवा. त्यानंतर डावा पाय उजव्या मांडीवर ठेवा.
३. ज्ञान मुद्रेत दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा.
४. कंबर, पाठ, मान सरळ रेषेत ठेवा. डोळे मिटवून घ्या.
लाभ : चित्त शुद्ध, शांत व स्थिर होते. मन:शांती मिळते. पचनशक्ती वाढते. हृदयविकार व मनोविकार नाहीसे होतात. मनाची चंचलता कमी होते.