आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहज सुलभ योगासने : उत्तान पादासन – प्रकार 1

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दैनंदिन जीवनात माणसाच्या आरोग्या खूप महत्त्व आहे. आरोग्य बरे असेल, तरच आपण इतर ध्‍येय गाठू शकतो.

पाठीवर झोपून करावयाचे आसन आहे.
कृती : १. पाठीवर झोपावे. दोन्ही पाय जुळलेले असावेत. हात शरीराला समांतर ठेवावेत. तळवे जमिनीला चिकटून ठेवावेत.
२. डावा पाय गुडघ्यात न वाकवता सावकाश वर नेऊन ३० अंशपर्यंत वर उचलावा. काही सेकंद या स्थितीत स्थिर राहावे.
३. परत पाय आणखी वर उचलून ६० अंश इतका न्यावा, स्थिर राहावे.
४. शेवटी ९० अंशपर्यंत पाय वर नेऊन स्थिर राहावे.
५. पाय सावकाश खाली आणवा. उजव्या पायाने परत हीच क्रिया करावी.
लाभ : पोटाचे स्नायू बळकट बनतात. उदरातील इंद्रियांना हलकेसे मालीश होते. अपचन, गॅसेस वगैरे पोटाचे विकार दूर होतात. पोटातील अशुद्ध वायू बाहेर पडतो. मधुमेहींसाठी उपयुक्त आसन.