कृती : पाठीवर झोपून करायचे आसन.
१. पद्मासन घालून बसावे. मनगट, कोपरा जमिनीवर टेकवून त्या आधारे झोपून डोके जमिनीला लावावे.
२. दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे अंगठे धरावेत.
३. हातांच्या कोपरांचा आधार घेऊन त्याच्या साह्याने मान वळवून टाळू जमिनीला टेकवावी आणि पाठीची कमान करावी.
४. श्वसन सामान्य ठेवावे. उलट क्रमाने आसन सोडावे.
लाभ : पाठीचे कुबड नाहीसे होते. पाठ, कंबर मानेचे दुखणे दूर होते. पोट पातळ बनते. गळा, ओटीपोट व छातीचे स्नायू बळकट बनतात. मधूमेह, दमा, फुफ्फुसांचे विकार यावर गुणकारी.
* लेखिका योगशिक्षिका आहेत