कृती : हे उभे राहून करावयाचे आसन आहे. १) सरळ ताठ उभे राहावे. पाय जुळवून ठेवावेत. कंबर पाठीचा कणा ताठ ठेवावे. २) श्वास घेत दोन्ही हात वर उचलावेत कंबरेपासून शरीर मागे झुकवावे. ३) दोन्ही हात नमस्कार स्थितीत ठेवावेत. ४) काही सेकंद या स्थितीत थांबून हात
खाली आणून दंड स्थितीत सरळ उभे राहावे.
लाभ : यामुळे खांदे बळकट बनतात. अन्ननलिकेस पोषण मिळून अन्ननलिकेचे विकार व दोष दूर होतात. सर्दी व घशाचे विकार बरे होतात. कंबर व पाठीचा मणका शशक्त बनतात.
- लेखिका या योगा शिक्षिका आहेत