आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्टफोन वापरताय?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मार्टफोनचा वापर प्रचंड वाढला आहे. अाबालवृद्ध त्याचा वापर वेगवेगळ्या कामांसाठी करत आहेत. ही कामं करताना, खेळताना, डाउनलोड करताना, शेअर करताना काय काळजी घ्यायला हवी, याविषयी सांगणारं हे नवीन सदर आजपासून.

मोबाइल व्हायरस स्मार्टफोनमध्ये धुडगूस घालत आहे. स्मार्टफोनवर इंटरनेटचा वापर वाढलेला आहे. त्यामुळेच अँड्रॉइड सिस्टिमना असणारा व्हायरस व मालवेअरचा धोकाही वाढला आहे. ते सिस्टिममधील विविध बाबींना लक्ष्य करत आहेत. स्मार्टफोनचा वापर करणाऱ्यांची संख्या ज्या प्रमाणात वाढतेय, त्याच प्रमाणात त्याची यंत्रणा बिघडवण्यासाठी अनेक व्हायरसही बाजारात येऊ लागले आहेत. हे व्हायरस आपल्या फोनची खूप हानी करू शकतात. एकमेकांकडून माहितीची देवाण-घेवाण करताना, वाय-फाय नेटवर्कचा वापर करताना व्हायरसचा धोका अधिक असतो.
अँड्रॉइड सिस्टिममध्ये आढळणारे काही व्हायरस असे आहेत. अँड्रॉइड व्हायजर या व्हायरसचा वाटा सर्वाधिक आढळतो. गूगल प्लेवरील अॅप्स घेऊन वापरताना या व्हायरसचा धोका असून तो मोबाइल अॅडवेअरच्या रूपात सिस्टिममध्ये प्रवेश करतो. या व्हायरसमुळे मोबाइलवर अनावश्यक मेसेज दिसू लागतात.

> नुकसान
हा व्हायरस मोबाइलचे लोकेशन व आयएमईआय नंबर हॅक करतो.

> उपाय
हा व्हायरस सिस्टिममधून नष्ट करण्यासाठी इनस्टॉल केलेले अॅप पूर्णपणे सिस्टिममधून काढून टाकावे.

दुसरा सामान्य व्हायरस

>अँड्रॉइड डॉजिन
हा सिस्टिमवरील व सबस्क्रायबर आयडी, मोबाइलची लोकेशन इत्यादी चोरतो.

> इतर काही व्हायरस-
Android Smsspy.l, फोबस, अँड्रॉइड कूगॉस, एसएमएस थीफ असे आहेत.

> नुकसान
ऑनलाइन शॉपिंगसाठी मोबाइलवरून केल्या जाणाऱ्या बँकिंग व्यवहारांना आहे. ज्यामध्ये युजरचा बँकिंग आयडी व पासवर्ड चोरण्याचा हा व्हायरस प्रयत्न करू शकतो.

> मोबाइलमधून महत्त्वाचा डाटा चोरून थर्ड पार्टीला पाठवला जातो. म्हणजेच मोबाइल डाटाही ट्रान्सफर होतो आहे. ज्यामुळे तुमचा जो पर्सनल डाटा आहे तो एका अज्ञात स्थळावरती ट्रान्स्फर होतो.

> काही मालवेअर किंवा व्हायरस हजारो फोननंबरच्या माध्यमातून टेक्स्ट मेसेज आणि कॉल करतात, आणि त्याद्वारे मोबाइलचे बिल वाढवतात.

खबरदारी
> युजरनी मोबाइलवरून खरेदी करताना शॉपिंग वेबसाइटच्या अधिकृत अॅप्सचाच वापर करावा.

> व्हायरसमुळे मोबाइलची काळजी घेणे महत्त्वाचे झाले आहे. मोबाइलमध्ये चांगले अ‍ॅण्टीव्हायरस टाकावे.

>अॅप इनस्टाॅल करताना विश्वासू मार्केट स्पेसवरून करावे.

> डाटा युसेज ट्रॅकर अॅप वापरावे, म्हणजे व्हायरसमुळे यूज होत असलेल्या डाटाची माहिती मिळेल.

काय टाळावे :
>मोबाइलवरून खरेदी करताना ई-मेलद्वारे पाठवल्या जाणाऱ्या लिंक्स वा यूआरएलच्या साह्याने खरेदी करू नये.

(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कॉम्प्युटर विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)
(handgeyogesh@gmail.com)