आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्राचा मंत्रः मोबाइलचे डॉक्टर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मार्टफोनची यंत्रणा बिघडवण्यासाठी अनेक व्हायरसेसही बाजारात आलेले आहेत. हे व्हायरसेस फोनची खूप हानी करू शकतात. त्यामुळे यांच्यापासून जपून राहिले पाहिजे.
व्हायरसचा धोका केव्हा?
माहितीची देवाणघेवाण करताना, वायफाय नेटवर्क वापरताना व्हायरसचा धोका अधिक असतो. अशा वेळी कोणते अ‍ॅण्टीव्हायरस उपयुक्त असतात, हे जाणून घेऊ या!

कॅस्पर्सस्काय : हा अ‍ॅण्टीव्हायरस कॉम्प्युटरबरोबरच मोबाइलसाठीही उपयोगी आहे. हा फोन मेमरी पूर्ण स्कॅन करतो. मालवेअर्स, व्हायरस फाइल डिलीट करण्यास मदत करतो. यामुळे स्मार्टफोनमधील डेटा सुरक्षित राहतो. या सॉफ्टवेअरमध्ये ब्लॅकलिस्टची सुविधा उपलब्ध आहे, ज्यायोगे नको असलेल्या नंबरवरून येणारे कॉल्स आणि एसएमएस ब्लॉक करू शकता. यातील थेफ्ट प्रोटेक्शनमुळे तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तरी एका एसएमएसद्वारे त्यात नव्याने घातलेल्या सिमकार्डची माहिती मिळू शकते. कॅस्पर्सस्काय मोबाइल सिक्युरिटी हा अ‍ॅण्टीव्हायरस अ‍ॅण्ड्रॉइड, विंडोज स्मार्ट फोन्ससाठी उपलब्ध आहे.

वेबरूट : अ‍ॅण्ड्रॉइड स्मार्टफोनमध्ये डाउनलोड केल्या जाणाऱ्या अ‍ॅप्समधून येणाऱ्या धोकादायक व्हायरस, मालवेअर्स फाइल्स हा डिलीट करतो. इन बिल्ट अ‍ॅप्स स्कॅनरमुळे तुम्ही थर्ड पार्टी सॉफ्टवेअर्स डाउनलोड केले तरी ते आपसूक स्कॅन होतात. एखाद्या अ‍ॅप्लिकेशनमध्ये व्हायरस फाइल असल्यास वेबरूट त्याचं इन्स्टॉलेशन रिजेक्ट करतो. कॉल, एसएमएस ब्लॉकिंगची सुविधाही यात आहे. सिक्युअर वेब ब्राउझिंग हे वेबरूटमधील महत्त्वाचे वैशिष्ट्य, ज्यायोगे तुम्ही वेब पेज ओपन केल्यावर वेब लिंक्स, यूआरएल लिंक्स धोकादायक असतील तर ते वेबपेज आधीच ब्लॉक होतं.

अवास्त : अवास्त ही अ‍ॅण्टीव्हायरसची कंपनी आहे. या कंपनीचाही मोबाइल अ‍ॅण्टीव्हायरस असून यामध्ये व्हायरस स्कॅनर, प्रायव्हसी अ‍ॅडव्हायजर, अ‍ॅप्लिकेशन मॅनेजमेंट, शील्ड कंट्रोल, एसएमएस अँड कॉल फिल्टर, फायरवॉल, नेटवर्क मीटर अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. आपण माहितीची देवाणघेवाण करताना कोणत्याही प्रकारचा व्हायरस त्यामध्ये असेल तर आपल्याला हा अ‍ॅण्टीव्हायरस वेळीच सूचित करतो. मग आपण ती माहिती घ्यायची की नाही, हा आपला निर्णय असतो. इतकेच नव्हे तर ती माहिती स्कॅन करण्याची सुविधाही यामध्ये आहे.

नेटक्वीन मोबाइल सिक्युरिटी
हा अ‍ॅण्टीव्हायरस तुमचा पूर्ण फोन जलद स्कॅन करण्यास मदत करतो. ऑटोमेटिकली व्हायरस डेटाबेस अपडेट करणे, लॉस्ट फोन लोकेशन, प्रायव्हसी प्रोटेक्शन, कॉन्टॅक्ट्स बॅकअप ही या मोबाइल सिक्युरिटीची वैशिष्ट्यं आहेत. स्मार्टफोनमध्ये व्हायरस, मालवेअर्स, फोन हॅकर्सपासून तुमचा डाटा सेफ ठेवण्याचे काम हा करतो. त्यातील ट्रॅफिक मॅनेजरमुळे तुम्हाला महिन्याभरात वापरलेल्या डेटाचे प्रमाण कळू शकते. तो हॅकर्सना ब्लॉक करतो. प्रायव्हसी प्रोटेक्शन, फोन लोकेटर, सिक्युअर डेटा ब्राउिझंग हे फीचर्सदेखील नेटक्वीनमध्ये आहेत. यामधील अ‍ॅन्टी लॉस्ट फीचरमध्ये साउंड अलार्मची सुविधाही आहे. तसेच हे फीचर हरवलेल्या फोनचे लोकेशनसुद्धा शोधू शकते. अ‍ॅण्ड्रॉइड, सिम्बियन, ब्लॅकबेरी स्मार्टफोन्समध्ये हे सॉफ्टवेअर सपोर्टेबल आहे.

मॅकफी : व्हायरस, स्पायवेअर्सपासून डेटा प्रोटेक्ट करण्याचे काम मॅकफी करतो. ‘साइट अ‍ॅडवायजर’ हे याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. ज्यामुळे सुरक्षितरीत्या नेटसर्फिंग आणि ऑॅनलाइन शॉिपंग करता येते. फोन हरवला किंवा चोरीला गेला तर हा अ‍ॅण्टीव्हायरस तुमचा डेटा प्रोटेक्ट करतो. यामधील सेफगार्डमुळे स्पायवेअर्स, मालवेअर्सपासून फोन सुरक्षित राहतो. हा अ‍ॅण्टीव्हायरस सोशल नेटवर्किंग साइट्स, ईमेल, एसएमएस, एमएमएसमधून येणाऱ्या धोकादायक लिंक ब्लॉक करतो. अ‍ॅण्ड्रॉइड, विंडोज, सिम्बियन, ब्लॅकबेरी स्मार्ट फोन्ससाठी तुम्ही तो वापरू शकता.
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कॉम्प्युटर विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

handgeyogesh@gmail.com
बातम्या आणखी आहेत...