आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅप डाउनलोड करण्‍यापूर्वी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सावधान! स्मार्टफोनमध्ये कुठलेही अॅप्लिकेशन अथवा गेम्स डाउनलोड आणि इन्स्टॉल करताना काळजी घ्या. बहुतेक लोक हे करताना अॅपच्या ‘टर्म्स अँड कंडिशन्स’ सविस्तर न वाचता ‘अॅक्सेप्ट’ हा पर्याय निवडतात. जेव्हा तुम्ही ‘अॅक्सेप्ट’ हा पर्याय निवडता तेव्हा स्मार्टफोनमधील फाइल्स, फोन नंबर्सची यादी, सर्व माहिती, फोटो, तुमचं लोकेशन अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्या अॅपला वापरण्याची परवानगी तुम्ही देत असता. अशा रीतीने नकळत तुम्ही तुमच्या फोनचा कंट्रोल त्या अॅपच्या कंपनीच्या हातात देत असता. आणि ही डाउनलोड केलेली अॅप तुमच्या फोनमधील सर्व माहिती त्यांच्या कंपनीला पोहोचवतात. ‘अॅप्लिकेशन कंपन्या’ युजर एक्सपिरिअन्सची माहिती मिळवण्याच्या नावाखाली तुमच्या घडामोडींवर लक्ष ठेवू शकतात. परंतु मोबाइलमधल्या कुठल्याही गोष्टीचा उपयोग कंपनी स्वतःच्या वापरासाठी करू शकत नाही.  अनेक प्रकरणांत काही कंपन्यांचे अॅप्स महिलांच्या मोबाइलमधील त्यांचे फोटो चोरून फोटोशॉपच्या साहाय्यानं फोटोमध्ये फेरफार करून अश्लील वेबसाइटवर अपलोड केल्याचं सायबर सेलला तपासात आढळून आलेलं आहे.

सायबर कायदा
- आपल्याकडे आयटी अॅक्ट २००० हा सायबर क्राइमसाठी बनवलेला अत्यंत कडक असा कायदा अस्तित्वात आहे.
- छायाचित्रं किंवा व्हिडिओ मिळवून ते पोर्नोग्राफी साइट्सवर वापरणाऱ्याला या कायद्याअंतर्गत कडक अशी शिक्षा होऊ शकते. गुन्हा सिद्ध झाल्यास दहा वर्षे तुरुंगवास व मोठा दंड होऊ शकतो.
- सायबर कायद्यांतर्गत विविध शिक्षांची तरतूद केलेली आहे
- एखाद्या व्यक्तीचा फोटो तिच्या संमतीविना काढणं, सोबत बाळगणं किंवा शेअर करणं या प्रकरणी दोषीला तीन वर्षे कारावास आणि दोन लाख रुपये दंड
- अश्लील क्लिप्स फॉरवर्ड करणं, शेअर करणं, फोटो चोरून त्यात फेरफार करणं या प्रकरणी दोषीला सात वर्षांचा कारावास आणि दहा लाखांचा दंड होऊ शकतो.

स्मार्टफोन वापरताना खालील काळजी घ्या
- खासगी माहिती किंवा फोटो मोबाइलमध्ये ठेवू नका.
- नेट बँकिंग व ईमेलचे पासवर्ड वारंवार बदलत राहा.
- उपयोगात नसलेले अॅप आणि गेम्स अनइन्स्टॉल करा.
- आठवड्याला मोबाइलमधली मेमरी क्लीन करा.
- फोनमधील माहिती चोरीला गेल्यास तत्काळ पोलिसांच्या सायबर क्राइम सेलशी संपर्क साधून तक्रार नोंदवा.
- अनोळखी व्यक्तींशी अॅपद्वारे खासगी संवाद करू नका.
 
handgeyogesh@gmail.com
 
बातम्या आणखी आहेत...