आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉम्पुटर व्हायरसचा गंभीर उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज सर्व व्यवहार संगणकीकृत झाल्याने संगणक टाळणे शक्य नाही. इंटरनेटच्या माध्यमातून संपूर्ण जग मानवाच्या अंगणात आले आहे. परंतु, घरोघरी संगणक असूनही त्याच्या सुरक्षिततेविषयी कोणाला फारशी माहिती नसते. आजच्या संगणकीय युगात ‘व्हायरस’ हा शब्द तुमच्या परिचयाचा असेल, तसेच या व्हायरसचा तुम्हाला बऱ्याच वेळा त्रासदेखील झाला असेल.

कॉम्प्युटर व्हायरसचे दुष्परिणाम
- संगणक अचानक खूप स्लो होणे.
- कधी अचानक तुम्ही न उघडलेल्या फाइल ओपन होतात, अचानक रिकामे फोल्डर दिसू लागतात. कधी असेही झाले असेल की, तुमच्या संगणकामध्ये एक मालवेअर येतो आणि त्याच्यामुळे तुमच्या हार्ड डिस्कच्या ड्राइव्हज उघडत नाहीत.

कॉम्पुटर व्हायरस
हा एक प्रकारचा लहान प्रोग्राम असतो, जो आपल्या संगणकासाठी हानिकारक असतो. virusदेखील वेगवेगळ्या प्रकारचे असतात; virus, malware इ. संगणक slow करण्यापासून संगणक hack करण्यापर्यंत काम करतो.
 
कसा शिरतो कॉम्प्युटर मध्ये व्हायरस? 
आपण काहीच न करता जसे आपल्या शरीरात जंतू शिरू शकतात, तसे संगणकाच्या बाबतीत होऊ शकत नाही. आपल्या संगणकात व्हायरस शिरला तर त्याला पूर्णपणे आपणच जबाबदार असतो.

१. इंटरनेटला आपला संगणक जोडणे.
२. इमेलमधून आलेल्या व्हायरस असलेल्या फाइल्स आपल्या संगणकावर उतरवून घेणे.
३. संगणकावरील एखादा व्हायरस असलेला प्रोग्राम चालू करणे.
४. फ्लॉपी डिस्क/फ्लॅश मेमरी संगणकात घालून अथवा दुसऱ्या संगणकास आपला संगणक जोडून काही व्हायरस असलेल्या फाइल्स कॉपी करणे.
५. एखादी अशी सीडी संगणकाच्या ड्राइव्हमध्ये घालणे की, ज्यामध्ये व्हायरस असलेल्या फाइल्स आहेत.
व्हायरस आपल्या संगणकापासून दूर ठेवण्यासाठी सध्या अनेक प्रकारची अॅण्टी व्हायरस सॉफ्टवेअर आहेत. त्यातील काही पैसे देऊन खरेदी करावे लागतात, तसेच काही अॅण्टी व्हायरस इंटरनेटवर मोफत मिळतात.
 
व्हायरस आणि मालवेअर हल्ला टाळण्यासाठी उपाययोजना
- तुमच्या सिस्टिममध्ये एखाद्या चांगल्या कंपनीचा अॅण्टी व्हायरस टाकून घ्यावा आणि अॅण्टी व्हायरसची शेवटची तारीख लक्षात ठेवून ते वेळच्या वेळी अपडेट करून घ्यावे. 
- तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरला जेव्हा कधी मोबाइल, पेन ड्राइव्ह किंवा दुसरे कोणते डिव्हाइस जोडाल तेव्हा ते स्कॅन करून घ्या. कोणत्याही नोंदणीकृत वेबसाइटवरूनच काही डाऊनलोड करावे. 
 
संगणकाची सिस्टिम वेळच्या वेळी फॉरमॅट करत जा.
- अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर नियमितपणे वापरून संपूर्ण पीसी स्कॅन करणे गरजेचे आहे.
- कॉम्प्युटरची आॅपरेटिंग सिस्टिम अद्ययावत ठेवा. विंडोज सिस्टिममध्ये ऑटोमॅटीक सिक्युरिटी अपडेट्सची सुविधा चालू करा.
- फाइल्स, हार्ड ड्राइव्ह, तसेच बॅकअप ड्राइव्हसाठी एन्क्रिप्शनचा वापर करा. एनक्रिप्ट केलेल्या फाइल्स पाहण्यासाठी पासवर्डची गरज असते.
- इमेल वापरतानादेखील काळजी घ्यावी. इमेलमधून आलेल्या वर्ड, एक्सेल किंवा पीडीएफ फाइल व्हायरस असू शकतात. इंटरनेट वापरण्यासाठी आपण जे ब्राउझर वापरतो, तेसुद्धा अपडेटेड असल्याची खात्री करावी. गुगलचे क्रोम हे एक उत्तम ब्राउझर आहे.

- योगेश हांडगे, पुणे
handgeyogesh@gmail.com
बातम्या आणखी आहेत...