आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बनावट व्‍हॉट्सअॅपपासून सावध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप असलेल्या व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांची संख्या वाढत असल्याने कम्प्युटरऐवजी आता मोबाइलवरून  अॅटक होत आहेत, त्यासाठी वेगवेगळी शक्कल सायबर भामटे लढवत आहेत. मागे  व्हॉट्सअॅप आणि फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे समोर आले होते आता तर सायबर भामट्यांनी व्हॉट्सअॅपचं एक बनावट व्हर्जन तयार केलं आहे. अॅप डेव्हलपरने गुगल सिक्युरिटीला भेदून हुबेहूब व्हॉट्सअॅपप्रमाणेच दिसणाऱ्या बनावट अॅपची निर्मिती केलेली आहे आणि ते प्ले स्टोअरवर उपलब्ध केलेलं आहे.


त्यामुळे व्हॉट्सअॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करताना काळजी घ्या! कारण हुबेहूब मूळ व्हॉट्सअॅपप्रमाणेच हे बनावट अॅप दिसते, त्यामुळे अनेक युजर्स हेच अॅप डाउनलोड करतात. फसवणूक होऊन काही लाख युजर्सनी हे अॅप डाउनलोड केलेलं आहे.
कशी होते ग्राहकांची दिशाभूल?


बनावट अॅपचे नावही हुबेहूब असल्यामुळे. 
हॅकर्सने युनिकोडचा वापर करून हुबेहूब नाव दिलं आहे. गूगल प्ले स्टोअरवर ‘Update WhatsApp Messenger’ या नावाने हे अॅप उपलब्ध आहे आणि  ते ‘WhatsApp Inc’ ने विकसित केलं आहे, असा उल्लेख त्यावर करण्यात आला आहे.

 

काय आहे या बनावट अॅपचा धोका?
व्हॉट्सअॅपच्या पॉलिसीनुसार तुमचे मेसेज, फोटो, व्हिडिओ आणि एकूण गोपनीय माहिती तुमच्याव्यतिरिक्त कुणीही पाहू शकत नाही. मात्र, या बनावट अॅपच्या माध्यमातून तुमच्या फाइल्सचा गैरवापर केला जाऊ शकतो. हे बनावट अॅप डाउनलोड केल्यास फोनमधील माहिती चोरीला जाण्याची शक्यता आहे. एखाद्या युजरची बदनामीही केली जाऊ शकते.


कसा  उघडकीस आला हा प्रकार?
एका ट्विटर युजरच्या माध्यमातून WABetaInfo या व्हॉट्सअॅप ट्रॅकिंग वेबसाइटने  या बनावट अॅपची माहिती दिली आणि हे  बोगस अॅप डाउनलोड करू नये, असे आवाहनही करण्यात आले. 


-योगेश हांडगे, पुणे
handgeyogesh@gmail.com

बातम्या आणखी आहेत...