आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाईल हॅकिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये अवघ्या काही तासांत सुमारे तीस व्हॉट्सअॅप आणि फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे समोर आले. हॅक करण्यात आलेल्या अकाउंटपैकी २६ महिलांचे आहेत. यावरून हॅकर्सनी महिलांना टार्गेट करायला सुरुवात केल्याचे उघड झाले अाहे. नेट सर्फिंग मोबाइलवरून करण्यास अनेक जण प्राधान्य देत आहेत. वापरकर्त्यांची संख्या वाढत असल्याने काॅम्प्युटरऐवजी आता मोबाइलवरून सायबर हल्ले होत आहेत आणि त्यांचे प्रमाण वाढत आहे.

कसे होते व्हॉट‌्सअॅप-फेसबुक अकाउंट हॅक?
व्हॉट‌्सअॅप-फेसबुक अकाउंट हॅक करून अकाउंटद्वारे अश्लील मेसेज पाठविले जातात. व्हॉट‌्सअॅप किंवा फेसबुक रिइन्स्टाॅल करताना संबंधित कंपनीकडून एक ओटीपी पाठवण्यात येतो. या पासवर्डच्या मदतीनेच आपण संबंधित अॅप्लिकेशन वापरू शकतो. हॅकर्स परिचितांपैकी एकाचा मोबाइल हॅक करून त्यावर व्हॉट्सअॅप रिइन्स्टाॅल करण्याचा ओटीपी मिळवून व्हॉट्सअॅप हॅक करतात आणि नंतर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये पोहाेचून इतरांचे मोबाइल हॅक करण्याचा सपाटा लावतात. व्हॉट‌्सअॅप अकाउंट हॅक करून रिइन्स्टाॅल करताना नागरिकांच्या मोबाइलवर ओटीपी आल्यावर हॅकर हॅक केलेल्या अकाउंटवरून काही भूलथापा मारून ओटीपी पाठवण्याबाबत विनंती करतो. आपल्या ओळखीतील व्यक्ती मदत मागते म्हणून संबंधित तो मेसेज फॉरवर्ड करतो. अशा रीतीने हॅकर सहजपणे हॅकिंग करू शकतो.

हॅकर्स काय करतात?
- हॅकिंगमध्ये अनेकदा फोनमध्ये स्टोअर असलेली माहितीही बदलली जाते. तसेच अनेक वेळा मोबाइलचा डेटा हॅक करून बँक खात्यातून परस्परच रुपये दुसऱ्या खात्यात वळविले जातात.
- मोबाइलमध्ये सर्व असलेले सर्व अॅप्लिकेशन अगदी मेल, फेसबुक, ट्विटरसुद्धा हॅक केले जातात. मेलमध्ये असलेल्या डेटाचा वापर करत क्रेडिट, डेबिट कार्डची गोपनीय माहिती मिळवून त्याद्वारे लाखो रुपये काढले जातात.

मोबाइल कसे हॅक होतात?
-  जीएसएम तंत्रज्ञान असलेल्या मोबाइल फोनला हॅक करण्यासाठी लागणारे हार्डवेअर सहज जोडता येते. त्यामुळे ते हॅकर्सच्या जाळ्यात फसतात.
-  मोबाइल हॅक करण्यासाठी हॅकर्सकडून काही विशिष्ट ‘लिंक’ (मालवेअर असलेली) नागरिकांना पाठविली जाते आणि नागरिकांना फोन करून त्या लिंक पाठवलेले मेल, मेसेज उघडण्यास सांगण्यात येते. अनेकदा सरकारी कार्यालयातून बोलत असल्याचा बनाव करून नागरिकांशी संपर्क साधण्यात येतो.
-   हॅकर्स केवळ एक मेसेज पाठवून आपल्याला हवा त्याचा मोबाइल हॅक करून त्यावरील संभाषण, माहिती, छायाचित्र दूरवरून मिळवू शकतात.

लक्षणं...
- फोन अचानक रिस्टार्ट, शटडाऊन होणे.
- मोबाइलमधून आपोआप एसएमएस पाठवला जाणे.
- मोबाइलमधील अॅप्स अचानक सुरू किंवा बंद होणे.
- या पार्श्वभूमीवर आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यायला हवी.
- पैसे देण्यापूर्वी केवळ चॅटिंगवर विसंबून न राहता मोबाइलवर बोलून खात्री करून घ्यावी.
- मेलमध्ये किंवा एसएमएसमध्ये आलेली अनोळखी लिंक उघडू नये आणि ती लिंक चुकून उघडल्यास मोबाइल फॉरमॅट करून घ्यावा.
- अनोळखी व्यक्ती मेसेज किंवा मेल करीत असेल तर तिला ब्लॉक करावे.

काळजी...
- ब्लूटूथ वापरत असाल तर ते बंद किंवा इनव्हिझिबल मोडमध्ये ठेवा.
- फोन सतत अपडेट करत राहा. 
- तुमच्या फोनला पासवर्ड असू द्या. त्यामुळे दुसरा कोणीही तुमच्या फोनचा वापर करू शकणार नाही.
- मोबाइलवर आलेल्या कुठल्याही अनोळखी मेसेजमध्ये एखादी लिंक पाठवली गेली असेल तर ती उघडू नका. - मेलमधीलसुद्धा अनोळखी लिंक उघडू नका.
- एखादे अंॅटिव्हायरस अॅप इन्स्टॉल करा.
- मोबाइलचा आयएमईआय क्रमांक शेअर करू नका.

- योगेश हांडगे, पुणे
handgeyogesh@gmail.com
बातम्या आणखी आहेत...