आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोन बँकिंगचे फायदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुतेक मोठ्या बँकांनी फोन बँकिंग सुविधा सुरू केली आहे. यामुळे घरबसल्या बँकेचे व्यवहार करणे ग्राहकांना शक्य आहे. आयव्हीआरच्या माध्यमातून संबंधित बँकेच्या कर्मचाऱ्यांशी कोणताही संबंध न येता फोनसाठी देण्यात आलेल्या पासवर्डच्या माध्यमातून ग्राहकाला खात्यातील बॅलन्स, बिलं व इतर माहिती घरबसल्या मिळते.यामुळे वेळ वाचतो. ही सेवा २४ तास सुरू असते. फोन बँकिंग वापरताना फोनसाठी देण्यात आलेला पासवर्ड सुरक्षित ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे.

फोन बँकिंगमधल्या सुविधा
कार्ड गहाळ झाल्याचं कळवणं, तक्रारी, विनंत्या आणि चौकशा नोंदवणे. खात्यातील शिल्लक रकमेची माहिती मिळवता येते. खात्यातील शेवटच्या पाच व्यवहारांचीदेखील माहिती आपल्याला मिळते, किंवा शेवटच्या १५ व्यवहारांचे मिनी स्टेटमेन्ट फॅक्सद्वारे आपण मागवू शकतो.

धनादेशाच्या स्थितीची चौकशी करता येते. भारतात कुठेही देण्यात आलेल्या किंवा जमा करण्यात आलेल्या धनादेशाची स्थिती जाणून घेण्यासाठी फोन बँकिंगचा लाभ घेऊ शकतो.
धनादेशपुस्तिका/ खात्याचे स्टेटमेन्ट मागवता येते. केवळ फोनबँकिंगशी संपर्क साधून आपली धनादेशपुस्तिका किंवा आपल्या खात्याचे ताजे स्टेटमेन्ट घरपोच मागवता येते.
धनादेशाचे पेमेंट थांबवू शकतो.

कर्जाशी संबंधित चौकशी करू शकतो. बाकी कर्जाच्या रकमेची माहिती मिळते, आपण कर्जाच्या खात्याबद्दल चौकशी करू शकतो, व्याजाचे प्रमाणपत्र आणि कर्ज परतफेड वेळापत्रक घरपोच मागवू शकतो. आपल्या शहरातील फोन बँकिंगशी संपर्क साधून पसंतीची भाषा निवडून फोन बँकरशी चौकशी करू शकतो.
डिमॅटशी संबंधित चौकशी करता येते.
मुदत ठेवीचे खाते उघडता येते. आपल्या बचत खात्यातून निधी हस्तांतरण अधिकृत करून फोनवर मुदत ठेव खाते उघडण्यासाठी फोन बँकरशी चर्चा करता येते.
खात्या-खात्यात निधी स्थानांतरित करू शकतो. यात आपल्या खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे स्थानांतरित करू शकता. दोन्ही खाती ग्राहक क्रमांकाशी संलग्न असली पाहिजेत. आपण एका दिवसात काही ठरावीक रक्कम स्थानांतरित करू शकतो.
बिले भरता येतात. आपली मोबाइल, टेलिफोन, वीज आदी बिले फोन बँकिंगद्वारे भारता येतात, हे एक सर्वसमावेशक बिल पेमेन्ट निराकरण आहे.
एटीएम/डेबिट कार्ड पिन/नेट बँकिंग आयपिन वगैरे पुन्हा निर्माण करण्याची विनंती करता येते. आपले एटीएम/ डेबिट कार्ड पिन/नेट बँकिंग आयपिन वगैरे पुन्हा निर्माण करण्यासाठी फोन बँकिंगशी संपर्क साधता येतो.
आपले एटीएम/डेबिट/प्रीपेड कार्ड हरविल्याचे कळवता येते. जर आपले एटीएम/डेबिट/प्रीपेड कार्ड हरविले तर तुमची कार्डे अकार्यान्वित (ब्लॉक) करण्यासाठी कोणत्याही फोन बँकिंग क्रमांकावर संपर्क साधत येतो.
डिमांड ड्राफ्ट/मॅनेजर्स चेक यांची विनंती करता येते. फोन बँकिंगशी संपर्क साधून डिमांड ड्राफ्ट/मॅनेजर्स चेक घरपोच मिळविता येतात.
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कॉम्प्युटर विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
handgeyogesh@gmail.com
बातम्या आणखी आहेत...