आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-मेल कसा लिहाल?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ई मेल्स हा पर्याय सोपा आणि सुविधाजनक आहे. त्यामुळे आजकाल बरेचसे कामकाजाचे व्यवहार-संवाद ईमेल्समधूनच होतात. मेल आयडी तयार करताना तो बालिश अथवा विनोदी वाटणार नाही, याची अवश्य काळजी घ्या. त्यातून आपली पहिली प्रतिमा तयार होते, हे लक्षात असू द्या.
 
- ऑफिशिअल मेल करताना काही विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.
- सुरुवातीला स्वतःची ओळख लिहा. अनोळखी व्यक्तीला ई मेल करताना स्वतःची ओळख व्यवस्थितपणे करून देण्यासाठी तपशीलवारपणे लिहा. तसेच त्या व्यक्तीचा कॉन्टॅक्ट म्युच्युअल फ्रेंडकडून मिळाला असेल तर मेलमध्ये तसं अवश्य नमूद करा.
- एकाच वेळी अनेकांना सारखा मेल करत असाल तर  बीसीसी या पर्यायाचा वापर करा. यामुळे काम सोपे आणि लवकर होईल, शिवाय एका व्यक्तीचे तपशील दुसऱ्या व्यक्तीला समजणार नाहीत. परंतु, विषय सर्वांसाठी महत्त्वाचा असेल तर त्यांना सीसीमध्ये ठेवा, म्हणजे सर्वांना सर्वांची उत्तरे वाचता येतील व काम नीट पूर्ण होण्यास मदत होईल.
- मेलमधल्या भाषेकडे लक्ष द्या. मजकुरातील भाषेतून  उद्धटपणा किंवा अतिसलगीही सूचित होणार नाही, याची काळजी घ्या.
- शॉर्टफॉर्म्सचा वापर करू नका. एसएमएस किंवा चॅटिंग करताना वापरले जाणारे शॉर्टफॉर्म्स सब्जेक्ट लाइन सोडून इतर ठिकाणी मेलमध्येही वापरू नका. शॉर्टफॉर्म वापरणं म्हणजे तुम्हाला मेल करायला वेळ नसल्याचं दर्शवतं. 
- मजकुरातील स्पेलिंग तपासा. मेल करताना स्पेलिंगच्या चुका नको, कारण स्पेलिंग चुकलेले असेल तर समोरच्या व्यक्तीला त्याचा नेमका अर्थ समजणार नाहीच, पण तुम्हाला भाषेचे अपुरे ज्ञान आहे, असाही समज होईल. संगणक स्पेलिंगच्या चुका दाखवतो व दुरुस्तही करू शकतो, या सोयीचा फायदा घ्या. ई मेलला कमीत कमी अटॅचमेंट जोडा.
- कामकाजाचा मेल करताना अनावश्यक कागदपत्रांची  अटॅचमेंट करणं टाळून फक्त आवश्यक फाइलच मेलबरोबर जोडा. मेल थोडक्यात लिहा, अनावश्यक तपशील टाळा.
- शब्द किंवा वाक्य ठळक करण्याकरिता ते ‘हायलाइट’ करा किंवा ‘बोल्ड’ अथवा ‘इटालिक’ करा.
 
handgeyogesh@gmail.com
बातम्या आणखी आहेत...