आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोन चोरीला गेला तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅप्लिकेशन कंपन्या ‘यूजर एक्सपिरिअन्स’ची माहिती मिळवण्याच्या नावाखाली तुमच्या घडामोडींवर लक्ष ठेवू शकतात. अनेक अॅप्स स्मार्टफोनवरील घडामोडींवर लक्ष ठेवून फोनमधली काँटॅक्ट लिस्ट, व्हिडिओ, फोटो आणि इतर माहिती चोरून त्यांच्या कंपनीला पोहचवितात.

त्यामुळेच गूगलने आपल्या येणाऱ्या नव्या अँड्राॅइड फोनमध्ये Google Play Protect नावाचं एक नवीन फीचर समाविष्ट केलंय. हे फीचर यूझर्सना धोक्याची सूचना देणार आहे. तसंच जर तुमचा फोन हरवलाच तर मोबाइलमधील महत्त्वाचा डेटा कुणाच्या हाती लागू नये म्हणून फोनमधला डेटा तुम्हाला डिलीटही करता येऊ शकेल.

कुठल्या मोबाइलकरता? 
याला गूगलनं I/O २०१७ डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये सादर केलंय. हे फीचर गूगल मोबाइल सर्विस ११ किंवा त्याच्याहून मोठ्या व्हर्जनच्या अॅन्ड्रॉइड डिव्हाइसवर काम करेल.  या फीचरमुळे तुमचा फोन ऑटोमॅटिक स्कॅन होईल. तसंच यामुळे मालवेयर्सचीही माहिती मिळू शकेल.

कसे कराल एनेबल?
हे फीचर इतर अॅपप्रमाणे नाही म्हणून प्लेस्टोअरवर उपलब्ध नाही. याचं एक वेगळं पेज आहे, त्यावर याची सगळी माहिती उपलब्ध आहे. या पेजवर जाण्यासाठी सेटिंगमध्ये जाऊन ‘गूगल’वर टॅप करा. तिथे ‘सिक्यूरिटी’ हा ऑप्शन दिसेल त्यावर टॅप करा. त्यानंतर ‘व्हेरिफाय अॅप’वर क्लिक करा. मग या सर्व्हिस तुम्ही एनेबल किंवा डिसेबल करू शकाल. 
 
मोबाइल हरवल्यानंतर  कसा करायचा डाटा डिलीट?
या फीचरला ‘एनेबल’ केल्यास पुढच्या वेळेस कुठलाही नवीन अॅप इन्स्टॉल केल्यावर त्याला स्कॅन करून तुमचा मोबाइल सुरक्षित आहे की नाही, तसेच तुमचा मोबाइल हरवला तर तुमच्या मोबाइलचा पूर्ण डाटा डिलीट करण्याचेही ऑप्शन तुम्हाला मिळेल. त्याकरता गूगलवर जाऊन अँड्राॅइड डिव्हाइस मेसेंजरवर जावं.आणि तिथे तुमचे जीमेल अकाउंट लॉग इन केल्यावर तुम्हाला तुमच्या डिव्हाइसच्या लोकेशनची माहिती मिळेल. त्यावरून तुम्हाला तुमचा फोन लॉक अथवा मोबाइल डाटा डिलीट करता येईल.
 
- योगेश हांडगे, पुणे
handgeyogesh@gmail.com
बातम्या आणखी आहेत...