आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांच्या सोयीसाठी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आधुनिक काळानुसार तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला जात आहे. त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे ‘एमएसआरटीसी मोबाइल रिझर्व्हेशन अॅप.’

सध्याच्या युगात मोबाइल अॅप्स आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनले आहेत. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अॅप्सपैकी अनेक अॅप्स लोकप्रिय असतातच, परंतु ती आपल्यासाठी अतिशय उपयुक्तही असतात. रेल्वे आणि राज्य परिवहन म्हणजेच एसटी या दोन उपयोगी अॅप्सविषयी माहिती घेऊ.

रेल्वेच्या मोबाइल अॅपमुळे रेल्वे प्रवाशांना आता त्यांच्या स्मार्टफोनवर रेल्वेची माहिती काही क्षणांत उपलब्ध होऊ शकते. गाडी नेमकी किती वाजता येणार, तसेच जाणार आणि गाडी सध्या कोणत्या ठिकाणी आहे, याची अगदी बिनचूक माहिती प्रवाशांना या अॅपद्वारे मिळू शकते. मायक्रोसॉफ्टच्या मदतीने हे अॅप विंडोज ८ची सुविधा असणाऱ्या मोबाइल आणि संगणकावर सुरुवातीला वापरता येते. या अॅपमुळे प्रवाशांची धावपळ कमी होते, तसेच त्यांचा वेळही वाचतो. या आधी रेल्वे गाड्यांसंबंधी अथवा आरक्षणासंबंधी माहिती मिळविण्यासाठी प्रवासी १३९ हा हेल्पलाइन क्रमांक, रेल्वेचे संकेतस्थळ (irctc.com), रेल्वे स्थानकांवरील फलक, चौकशी केंद्र आदींचा वापर करत असत. त्यात आता मोबाइल अॅपची भर पडली आहे. या अॅपमधून आरक्षित तिकीटही काढता येते. पीएनआर स्टेटस तपासता येते. ही अॅप्स विंडोज, अँड्राॅइड फोनवर उपलब्ध आहेत.

एसटीचे अॅप : एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आधुनिक काळानुसार तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला जात आहे. त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे, ‘एमएसआरटीसी मोबाइल रिझर्व्हेशन अॅप.’ या अॅपद्वारे प्रवाशांना हव्या त्या गाडीच्या तिकिटाचे आरक्षण करता येणार आहे. या अॅपद्वारे प्रवशांना तिकिटाचे पैसे ऑनलाइन भरता येणार आहेत. त्यामुळे यापुढे तिकीट आरक्षण केंद्रावरील रांगेत थांबावे लागणार नाही. अँड्राॅइड मोबाइलसाठी ‘गूगल प्ले स्टोअर’वर हे अॅप मोफत उपलब्ध आहे. अॅप डाउनलोड केल्यानंतर आवश्यक माहिती सादर करून प्रवाशांना ‘लॉग-इन’ करावे लागेल. त्यानंतर प्रवाशांना कोठे जायचे आहे, कोणत्या गाडीने जायचे आहे, कोणत्या ठिकाणाहून गाडीमध्ये बसायचे आहे, तसेच कोणत्या ठिकाणावर उतरायचे आहे, या माहितीसह आसन क्रमांक, बसचा प्रकार, बसची वेळ प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार निवडण्याची सुविधा अॅपमध्ये आहे. तिकीट आरक्षण करताना ऑनलाइन पैसे भरण्याची सुविधादेखील आहे. त्यासाठी नेट बँकिंग, क्रेडिट व डेबिट कार्ड इत्यादी पर्याय देण्यात आलेले आहेत.

- योगेश हांडगे, पुणे
handgeyogesh@gmail.com
बातम्या आणखी आहेत...