आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाजगी माहिती जपा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या इंटरनेटचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे ‘ऑनलाइन सुरक्षा’ अतिशय महत्त्वाची आहे. फेसबुकसारख्या सोशल मीडिया साइटच्या माध्यमातून तुमची माहिती विविध जाहिरात कंपन्या किंवा उत्पादन कंपन्यांकडे जमा होते. या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इंटरनेटवर वापरकर्त्यांची माहिती चोरली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे इंटरनेटवर आपली माहिती सार्वजनिक होण्यापासून सुरक्षित ठेवण्याकरिता खबरदारी घेणे आवश्यक आहे. इतरांना कुणाच्याही खासगी आयुष्यात नाक खुपसण्याचा काहीही अधिकार नाही.
काही वर्षांपूर्वी अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा अन्य देशांसोबतच भारतातील टेलिफोन, इंटरनेट सेवेवरही नजर ठेवत असल्याचे उघड झाले होते. सीआयए या अमेरिकन गुप्तचर यंत्रणेमध्ये तांत्रिक सहायक म्हणून काम करणाऱ्या तरुणाने ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेची ही हेरगिरी जगासमोर उघड केलेली होती. या संस्थेत काम करताना त्याला सरकारकडून नागरिकांवर करण्यात येत असलेल्या हेरगिरीचा सुगावा लागला होता. नागरिकांच्या फोन कॉल्सवर लक्ष ठेवणे, फोेन कॉल्स रेकॉर्ड करणे, ऑनलाइन माहिती गोळा करणे असे या हेरगिरीचे स्वरूप होते. अमेरिकी गुप्तहेर यंत्रणांकडून इंटरनेटवरील महिती गोळा करताना देशांतर्गत कायद्याचे उल्लंघन होते आहे. शिवाय अंतर्गत बाबी दुसऱ्या देशाच्या गुप्तहेर यंत्रणेच्या हाती लागणे आपल्यासाठी धोकादायक आहे. तेव्हा काळजी घ्या.

इंटरनेटवरील खासगी माहितीच्या सुरक्षितेसाठी उपाय : 
ब्राउजर्सवर ‘अॅडऑन’ किंवा ‘एक्स्टेन्शन’ आपण वापरतो. यातून तुमच्या नकळत तुमची माहिती हाताळली जाते. त्यामुळे अशा ‘अॅडऑन’चा वापर कमी करावा किंवा टाळावाच. इंटरनेटवर ब्राउजिंग करताना तुमची ओळख अदृश्य ठेवण्याकरिता अनेक ब्राउजर्सवर सुविधा असते. 
- गुगल क्रोममध्ये ‘इनकॉग्निटो’, 
- फायरफॉक्समध्ये ‘प्रायव्हेट ब्राउजिंग मोड’ 
- मायक्रोसॉफ्टच्या ब्राउजरवर ‘इनप्रायव्हेट’ 

अशा सुविधा आहेत. हे पर्याय  संगणकामध्ये शिरू बघणाऱ्या हेरगिरी करणाऱ्या कुकीजना रोखते. त्याचप्रमाणे या सुविधेमुळे ब्राउजर्स अनोळखी संकेतस्थळांच्या ‘कुकीज’ना ‘ब्लॉक’ करतात. इंटरनेट वापरानंतर संगणक तसेच स्मार्टफोनवरील ‘कुकीज’, ‘कॅश’, ‘टेम्पररी फाइल्स’ हटवून टाका. कारण काही ‘कुकीज’ तुमच्या माहितीचा माग काढण्याचे काम करतात.  इंटरनेटच्या विविध खात्यांचे पासवर्ड सुरक्षित ठेवा.

इंटरनेट वापरताना नेटबँकिंग अकाउंट क्रमांक, आपला आयडी क्रमांक, पासवर्ड, क्रेडिट किंवा डेबिट पासवर्ड क्रमांक उघड करताना सावधानता बाळगावी. ऑनलाइन खरेदी करताना सुरक्षिततेचे उपाय योजावेत. स्पॅम मेल, फसवे मेल यावर डबल क्लिक करून उघडण्याचा प्रयत्न करू नये. अशा मेलमधून व्हायरसची एक्झिक्युटेबल फाइल नकळत डाउनलोड होते. आपण जेव्हा संगणकावर काम करतो तेव्हा केलेल्या कामाची एक डुप्लिकेट फाइल तयार होऊन ती हार्ड डिस्कवर सेव्ह होते. जेव्हा आपण इंटरनेट चालू करतो तेव्हा अलगदपणे ही माहिती हॅकरला मेलद्वारे प्राप्त होते. त्यामुळे फसगत टाळण्यासाठी अशा प्रकारचे फसवे मेल डिलीट करावे. आपली संगणक सिस्टिम अँटिव्हायरस, फायरवॉलने सुरक्षित ठेवावी.

- योगेश हांडगे, पुणे
handgeyogesh@gmail.com
बातम्या आणखी आहेत...