गडचिरोलीजवळ 5 जण / गडचिरोलीजवळ 5 जण बुडाले

Jun 28,2011 05:18:52 AM IST

गडचिरोली - येथील अहेरीजवळ दिना नदीत मेटॅडोर कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांना जलसमाधी मिळाली. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. दरम्यान, यातील दहा जणांना वाचविण्यात यश आले आहे. दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे दिना नदी तुडुंब भरून वाहत आहे. रविवारच्या बाजारासाठी एका मेटॅडोरमधून १५ जण चंद्रपूरहून अहेरीला जात होते. पुलावरून जाताना मेटॅडोरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे मेटॅडोर थेट नदीत कोसळून वाहून गेला. वाचविला. अन्य पाच जण नदीत बुडाले. स्थानिक ग्रामस्थांनी दोन मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

X