नागपूरमधील १५० / नागपूरमधील १५० गावे पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत

bhaskar network

Jun 18,2011 11:09:37 AM IST

नागपूर - जिल्ह्यातील ७३ गावे धोकादायक आणि ७९ गावे रेड झोन घोषीत करण्यात आली आहेत. नागपूरमध्ये होणा-या पावसाने या गावांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. येथे पुनर्वसनाची कामे सुरु आहे. मात्र सध्यातरी या गावक-यांना पाऊस आल्यानंतर आपले बि-हाड पाठीवर टाकून सुरक्षित स्थळ शोधण्याची कसरत करावी लागत आहे.नागपूरमध्ये नदी-नाल्यांच्या किना-यावर असणारी गावे मोठ्या प्रमाणात आहे. पावसाळ्यात या गावांमध्ये पाणी घुसण्याचे आणि पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. जिल्हा प्रशासनाने २००८ मध्ये ७३ गावांना धोकादायक अर्थात निळ्या झोनमध्ये टाकले आहे. तर ७९ गावांचा अशंत: धोकादायक अर्थात रेड झोन मध्ये समावेश केला आहे. निळ्या झोन पेक्षा ही गावे कमी धोकादायक असतात, या गावांमध्ये प्राधान्याने पुनर्वसनाची कामे करण्याची गरज होती. मात्र जिल्हा प्रशासनाने २००८ मध्ये तयार केलेली धोकादायक गावांच्या पुनर्वसानासाठी फार काही उपाययोजना केलेल्या नाहीत. तर दुसरीकडे २००८ ते २०११ या काळात धोकादायक गावांच्या संख्येतही वाढ झालेली आहे. जिल्हा प्रशासनाने या गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला आहे.यंदाच्या मान्सूनचा आढावा घेऊन प्रशासनाने नदीकाठावरील गावातील गावक-यांना सतर्कतेच्या आणि दुस-या गावांमध्ये स्थलांतरीत होण्याच्या सूचना केलेल्या आहेत. तसेच जोरदार पाऊस आल्यानंतर शाळेमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन या गावांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्नशिल असले तरी त्यासाठी किती वर्ष लागतील याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. त्यातल्यात्यात समाधानाची बाब एवढीच की, कामठी आणि रामटेक या दोन तालुक्यांमधील एकही गाव हे धोकादायक झोन मध्ये नाही.X
COMMENT