Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Mumbai Goa High Way accident

मुंबई - गोवा महामार्गावर दोन अपघातात चार ठार सहा जखमी

प्रतिनिधी | Update - May 28, 2013, 01:22 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार आणि सहा जण जखमी झाले आहेत.

  • Mumbai Goa High Way accident

    रायगड - मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार आणि सहा जण जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी सहाच्या दरम्यान रायगड जिल्ह्यातील माणगावजवळ दोन अपघात झाले. गारळ फाट्याजवळ ट्रक आणि स्कॉर्पिओ यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात तीन जण ठार आणि सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर माणगावच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना मुंबईला हलवण्यात आले आहे. स्कॉर्पिओमधील सर्व प्रवासी दहिसर येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
    तत्पुर्वी काल रात्री साडेअकराच्या सुमारास माणगावनजिक गोरेगावच्या हद्दीत झालेल्या अन्य एका अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.

    संग्रहित - छायाचित्र

Trending