आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायगडावरील शिवाजी महाराजांची अर्धी तलवार गायब, गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायगड - किल्ले रायगडावरील मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातील अर्धी तलवार गायब झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुरातन वास्तू संरक्षण अधिनियमांतर्गत अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पुरातन वास्तू संग्रहालय विभागाकडून रोज गडावर पाहणी केली जाते. शनिवारी सकाळी पाहणीदरम्यानच त्यांना शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील तलवार तुटलेल्या स्थितीत आढळून आली. या घटनेची माहिती कळताच कोल्हापूरच्या शिवाजी चौकात शनिवारी रात्री समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी परिस्थितीचा आढावा घेत लोकांना शांततेचे आवाहन केले आहे. गायब झालेला तलवारीचा भाग लवकरच दुरुस्त करण्यात येईल. दरम्यान, या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
शिवप्रेमींत संतापाची भावना
ही तलवार बनवताना ती सर्व वातावरणात टिकावी याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. तांबा धातूचा वापर करून हा शिवपुतळा घडवण्यात आला आहे. तलवार सहजगत्या तुटणे किंवा पडून जाणे शक्य नसल्याचे जाणकारांचे मत आहे. दरम्यान, घटनेनंतर शिवप्रेमींत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बातम्या आणखी आहेत...