आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Years Punishment By Rape Crime At Chiplun Tahasil

चिपळूण तालुक्यात सामूहिक बलात्कारप्रकरणी दोघांना सक्तमजुरी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिपळूण- तालुक्यातील तोंडली कांबळेवाडी येथील अल्पवयीन मुलीवर 2009 मध्ये झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी दोन नराधमांना 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा खेड सत्र न्यायालयाने सुनावली आहे.
दरम्यान, तोंडली कांबडेवाडी येथे सन 2009 मध्ये एका पंधरा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्‍यात आला होता. याबाबत 16 जून 2009 रोजी पीडित मुलीच्या आई-वडिलांनी सावर्डे पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सत्यजीत आमले यांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती. त्यांच्या विरुद्ध खेड ये्थील सत्र न्यायालयात खटला चालविण्यात आला. न्यायालयात याबाबत सुनावणी करण्यात आली. सत्र न्यायाधिश पी.एच. काळे यांनी आरोपी अनिल बाबु कांबळे (वय-24) आणि प्रकाश महादेव कांबळे (वय-40) दोघेही राहणार तोंडली, यांना 10 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणातील तिसरा आरोपी निलेश अनंत कांबळे (वय-17) याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी सरकारी वकील के.व्ही. भिडे यांनी काम पाहिले.