Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | 26 july 2005 heavy rain fall victims want rehabilitation

२६ जुलैच्या आठवणीने आजही थरकाप उडतो, दरडग्रस्तांचे पुनर्वसन अपूर्ण

प्रतिनिधी | Update - Jul 26, 2012, 01:02 PM IST

२६ जुलै २००५ चा तो दिवस आठवले की, महाड तालुक्यातली दासगाव, जुई, कोडिवते या गावातील लोकांच्या आंगावर आजही काटा उभा राहातो.

 • 26 july 2005 heavy rain fall victims want rehabilitation

  अलिबाग - २६ जुलै २००५ चा तो दिवस आठवले की, महाड तालुक्यातली दासगाव, जुई, कोडिंवते या गावातील लोकांच्या आंगावर आजही काटा उभा राहातो. आभाळ फाटल्यागत कोसळणा-या पावसाला आज सात वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र, अजूनही पावसामुळे घर उदध्वस्त झालेल्यांचे पुर्णतः पुनर्वसन झालेले नाही.
  २००५ ला झालेल्या मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला होता. दासगाव, कोंडिवते, जुई या डोंगरपायथ्याशी आणि नदीकिना-यावरील गावांना त्या पावसाची सर्वाधिक झळ बसली. जुई गावात दरड कोसळून त्या दरडीखाली सापडल्याने अनेकांचा मृत्यू झाला. अनेक दिवस तिथे मृतदेह शोधण्याचे काम सुरु होते. या दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न शासन दरबारी अजूनही मार्गी लागलेला नाही. त्यामुळे ते अजूनही त्याच भीतीच्या छायेत जगत आहेत.
  दासगावमधील अनेक घरांचे नुकसान झाले. आसपासच्या खेड्यातही दासगावसारखीच परिस्थिती होती. त्या अतिवृष्टीला सात वर्ष उलटून गेल्यानंतरही नागरिकांच्या पुनर्वसन झालेले नाही, आणि परिस्थिती फार काही बदलही झालेला नाही.
  दरवर्षी पावसाळा सूरु होण्याआधी पुनर्वसन केले जाईल हे आश्वासन मात्र राज्यकर्त्यांकडून नित्यनेमाने दिली जात आहे.
  १३ गावातील बेघर झालेल्या ७६५ कुटूंबाना सरकारने पुन्हा निवारा दिला असला तरी ३५० कुटूंब अजूनही निवा-याच्या शोधात आहेत. त्यांच्या घराचे बांधकाम अजून पूर्ण झालेले नाही. जिथे पुनर्वसन झाले तिथे अजूनही मुलबूत सोयी सुविधा पोहचलेल्या नाहीत. त्यामुळे या दरडग्रस्तांचे अजूनही हाल सुरुच आहेत.

Trending