आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखेडजवळ जगबुडी नदीत खासगी बस कोसळून झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या 37 वर पोहचली आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. आतापर्यंत 26 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतकांची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघातग्रस्त बस महाकाली ट्रॅव्हल्सची होती.
आजच्या अपघाताचे मुख्यकारण म्हणजे चालकाची चूक आहे. मुंबई-गोवा मार्गाच्या चौपदीकरणास उशीर झाल्याचे भास्कर जाधव यांनी मान्य केले आहे.
महाकाली ट्रॅव्हल्सकडे प्रवाशांची यादीच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे मृतकांची ओळख पटवण्यात प्रचंड अडचण होत आहे. खासगी ट्रॅव्हल्समध्ये अनेक प्रवासी विविध थांब्यांवरुन बसविण्यात येतात. त्यांना केवळ एक पावती देण्यात येते. त्यावर प्रवाशांचे नाव, संपर्क क्रमांक किंवा पत्त्याची नोंद नसते.
अपघातग्रस्त बस गोव्याहून मुंबईच्या दिशेने येत असताना, पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली ही बस 150 फूट उंचीवरून खाली नदीत कोसळली. पुलाच्या उजव्या बाजूचा कठडा तोडून ही बस नदीत टपावरच कोसळली. त्यामुळे पहाटेच्या गाढ निद्रेत असणार्या बेसावध प्रवाशांना सावध होण्याची संधीही मिळाली नाही. क्षणातच होत्याचे नव्हते झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.