Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Accident on Mumbai - Goa Highway 11 Death Near Khed

मुलगी पाहण्यासाठी आलेल्या चव्हाण कुटूंबियांवर काळाचा घाला; खेडजवळ अपघात, 11 ठार

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Jun 24, 2013, 03:31 PM IST

मुलगी पाहण्यासाठी तुरळ (ता. संगमेश्‍वर) येथे मालाड (मुंबई) येथून आलेल्या चव्हाण कुटूंबियांवर रविवारी मध्यरात्री काळाने घाला घातला.

 • Accident on Mumbai - Goa Highway 11 Death Near Khed

  रत्नागिरी- मुलगी पाहण्यासाठी तुरळ (ता. संगमेश्‍वर) येथे मालाड (मुंबई) येथून आलेल्या चव्हाण कुटूंबियांवर रविवारी मध्यरात्री काळाने घाला घातला. मुंबई- गोवा महामार्गावर लवेल-दाभीळजवळ त्यांच्या क्वॉलिस गाडीला समोरून येणार्‍या डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात 11 ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये तीन च‍िमुरड्यांचा समावेश आहे.

  चव्हाण कुटूंबिय मूळचे दापोली तालुक्यातील रहिवाशी आहेत. मात्र, ते मालाड येथे सध्या वास्तव्यास होते. मुलगी पाहण्याच्या निमित्ताने ते तुरळ (ता. संगमेश्‍वर) येथे रविवारी आले होते. रात्री जेवण आटोपून ते परत मालाडला निघाले होते. परंतु लवेल-दाभीळजवळ त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी क्वालिसमध्ये अडकलेल्यांना गाडीतून बाहेर काढले. कटरच्या साह्याने गाडीचे पत्रे कापून त्यामध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  मृतांची नावे अशी, अनंत सिताराम चव्हाण (62), अनिता चव्हाण (60), राकेश चव्हाण (26), हरिश चव्हाण (28), निता हरिश चव्हाण (23), हर्ष हरिष चव्हाण (आठ महिने), काशिनाथ तुकाराम माने (40), त्यांची पत्नी सुजाता माने (३५), मुलगा अविष्कार माने (६), मुलगी अनुष्का माने (८) तसेच प्रशांत अर्जुन मांजरे (३६, सर्वजण रा. मालाड, मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला.
  रमेश गणपती होळकर, अभिषेक मनोहर भुवड व डंपरचालक मोतीलाल बाळू चव्हाण (२४, सती चिपळूण) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  मुंबई-गोवा महामार्गावर खेडजवळ रविवारी रात्री क्वालिस आणि ट्रकमध्ये समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात ११ जण मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
  क्लालिस गाडी संगमेश्वरहून मुंबईकडे निघाली होती. त्याचवेळी खेडकडून चिपळूणकडे निघालेला वाळूच्या ट्रकची आणि क्वालिसची समोरासमोर टक्कर झाली. समोरासमोर टक्कर झाल्यामुळे मृतांचा आकडा वाढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Trending