Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Aditya Thakare Think Uddhav Become Chief Minister, Expressed Expectation In Yuva Sena Rally

आदित्य ठाकरेंना वाटते उद्धव मुख्यमंत्री व्हावेत, युवा सेनेच्या मेळाव्यात व्यक्त केली अपेक्षा

चंद्रकांत शिंदे | Update - Jan 17, 2014, 04:57 AM IST

‘राज्यातील व केंद्रातील कॉँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर खाली खेचण्याचा निर्धार तमाम शिवसैनिकांनी केला आहे.

  • Aditya Thakare Think Uddhav Become Chief Minister, Expressed Expectation In Yuva Sena Rally
    अलिबाग - ‘राज्यातील व केंद्रातील कॉँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर खाली खेचण्याचा निर्धार तमाम शिवसैनिकांनी केला आहे. देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान, तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजेत,’ अशा शब्दांत युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी अलिबागच्या मेळाव्यात शिवसेनेचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून उद्धव ठाकरेंची उमेदवारी जाहीर करून टाकली.
    युवा सेना पदाधिकार्‍यांच्या पहिल्या राज्यस्तरीय मेळाव्यात आदित्य म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण असे सूत्र सांगितले होते; परंतु, मी 100 टक्के राजकारण करावे, असे सांगत आहे. राजकारणात यश मिळाले तर सत्ता येऊ शकते. पदाधिकार्‍यांनी आपसांतील भांडणे संपवावीत. आगामी काळात मला तुमच्यातून खासदार, आमदार हवेत, असे सूचक वक्तव्यही आदित्य यांनी केले.
    लोकांची इच्छा असल्यास निवडणूक लढवीन : आदित्य
    लोकांची इच्छा असल्यास मी निवडणूक लढवेन, असे आदित्य ठाकरे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. ‘शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या रूपाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला आहे काय?’ या प्रश्नावर ते म्हणाले. ‘माझ्या म्हणण्याचा तसा अर्थ नाही. शिवशाही सरकार यावे असा जो शब्दप्रयोग केला जातो, त्या अर्थाने मी म्हटले.’

Trending