चिपळूण संमेलननगरीला यशवंतरावांचे / चिपळूण संमेलननगरीला यशवंतरावांचे नाव

प्रतिनिधी

May 22,2012 04:14:44 AM IST

रत्नागिरी। 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमानपदाचा मान चिपळूणला मिळाल्यानंतर तेथील संमेलननगरीला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्याची घोषणा यजमान लोकमान्य टिळक स्मारक ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आली.

यशवंतराव चव्हाण यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांना मानवंदना करण्यासाठी हा निर्णय घेण्याचे आल्याचे ग्रंथालयाचे कार्यवाह प्रकाश देशपांडे यांनी सांगितले. यशवंतरावांच्या जन्मशताब्दीनिमित्त संमेलन कराडला व्हावे, अशी कराडवासीयांची इच्छा होती. मात्र, 10 वर्षांपूर्वीच कराड येथे संमेलन झाले आहे. कोकणामध्ये गेल्या 22 वर्षांपासून संमेलन झालेले नाही. ही बाब साहित्य महामंडळाने ध्यानात घेतल्याचे महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांनी सांगितले. यशवंतराव केवळ महाराष्ट्राचे नाही, तर देशाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांना कराडपुरते र्मयादित ठेवू नये. आगामी साहित्य संमेलनात यशवंतरावांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकणारा परिसंवाद घेण्यात येईल, असे तांबे म्हणाल्या.

X
COMMENT