आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद निवडणुकीसाठी कोकणातून आठ उमेदवार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रत्नागिरी- अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या होणार्‍या निवडणुकीसाठी कोकणातून आठ उमेदवार उभे आहेत.
'नटराज' पॅनलचे 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे नाट्य कलाकार विनय आपटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोकणात 900 मतदार आहेत. निवडणुकीचा 20 जानेवारी रोजी मुंबई येथे संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मुंबईत या निवडणुकीसाठी 38 जागांसाठी 58 उमेदवार उभे आहेत. त्यापैकी 16 उमेदवार हे नटराज पॅनलचे आहेत.
प्रकाश कुशे, अँड. सुधाकर भावे, नाट्यलेखक प्र.लं. मयेकर व सुनील जोशी या चौघांचा समावेश आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशी, अंबरनाथ अशा सहा विभागात ही निवडणूक होणार आहे.