आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचखोर तलाठी आणि मंडळ अधिकार्‍यास कोठडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेड- सातबारा उतार्‍यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहाथ पकडण्यात आलेले दापोली महसूल विभागातील मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना खेड न्यायालयाने बुधवारी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

दापोली तालुक्यातील सोंडेघर येथील सहनमियॉं नांदगावकर यांच्या पत्नी सबीरा नांदगावकर यांनी दापोली शहरातील कोंड परिसरात चार गुंठे जमीन घेतली. या जमिनीचे फेरफार करून सातबाराचे उतारे मिळावे, अशी मागणी त्यांनी तलाठी जाधव यांच्याकडे केली होती. तराठी जाधव व मंडळ अधिकारी पांडूरंग शिंदे यांनी या कामासाठी नांदगावकर यांच्याकडे 15 हजार र रुपयांच्या मागणी केली होती.
नांदगावकर यांनी लाचलुचपत खात्याकडे केलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत खात्याच्या रायगड येथील पथकाने 4 मार्च रोजी तलाठी आणि मंडळ अधिकारी शिंदे या दोघांना लाच घेताना रंगेहाथ अटक केली होती. त्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयासमोर उभे करण्‍यात आले होते. खेड अतिरिक्त‍ सत्र न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.