आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भास्कर जाधव आणखी अडचणीत; प्राप्तीकर विभागाकडून शहांच्या कंपनीवर धाडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराड/चिपळूण- मुला-मुलीचा थाटामाटात शाही विवाह सोहळा पार पाडलेले राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते व मंत्री भास्कर जाधव यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शाही सोहळ्याचा खर्च करणा-या कराडमधील शहा कंस्ट्रक्शन या कंत्राटदाराच्या वेगवेगळ्या कार्यालयावर प्राप्तीकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. याचबरोबर लॉन मालकाची चौकशी, मंडप, डेकोरेटर्स यांचीही चौकशी करण्यात येत आहे. शहा यांच्या कराडमधील पंकज हॉटेलवर धाडी टाकल्या आहेत.

शहा कंत्राटदार कराडमधील मोठे प्रस्थ आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून शहा यांची राजकीय उठबस आहे. यशवंतराव चव्हाण यांनी कृष्णा नदीच्या पूलाचे काम शहांना दिले होते. या व्यवसायात शहा कुटुंबियांची आता तिसरी पिढी आहे. शहा परिवाराचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध असल्याचे बोलले जाते. भास्कर जाधव यांच्या मुलांच्या लग्नाचा खर्च शहा यांच्या कंपनीने केल्यामुळे ही कंपनी प्रकाशझोतात आली आहे. प्राप्तीकर विभागाने शहा कंपनीशी संबंधित व्यवसायाची सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली असून, चौकशी सुरु आहे. याबाबत अधिकचा तपशील अद्याप मिळालेला नाही.