नारायण राणेंची कोकणात / नारायण राणेंची कोकणात मोठी दहशत- भास्कर जाधव

प्रतिनिधी

Dec 02,2011 04:32:45 PM IST

रत्नागिरी- काँग्रेसचे वरिष्ठ नेते व उद्योगमंत्री नारायण राणे यांची संपूर्ण कोकणात मोठी दहशत आहे. मात्र आपण ती मोडून काढू, असे प्रतिपादन पालकमंत्री भास्कर जाधव यांनी केले.
नगरपरिषदेच्या प्रचारानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्याक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, राणे कशाप्रकारचे नेते आहेत साऱया महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे मी अधिक सांगण्याची गरज नाही. पण कोकणातला माणूस राणेंच्या दहशतीखाली वागतो आहे. ही दहशत योग्य नसून नारायण राणेंची दहशत आपण मोडून काढू. राणेंची दहशत मोडून काढली तर येथील लोक सुखाने राहतील व येथील विकासही झपाट्याने होईल.
मागील काही दिवसापासून राणे-जाधव यांच्यात ठिणगी पडली आहे. त्यांचा वाद पक्षीय पातळीवरही गेला होता. त्यामुळे दोन्हींही नेत्यांना आपल्या पक्षातील नेत्यांनी तंबी दिली होती. तसेच एकाच मंत्रीमंडळात राहून वाद घालू नका, असे सांगितले होते. त्यानंतर हा वाद थांबला असे वाटत असतानाच भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा राणे यांच्या तोफ डागली आहे.

X
COMMENT