Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Chiplun Congress Secretory Ramdas rane Meet Press

अन्यामुळेच शिवसेनेला रामराम; रामदास राणेंचा आरोप

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Feb 11, 2013, 12:56 PM IST

'पक्षांर्तगत होणार्‍या अन्यायामुळेच आपल्याला शिवसेनेतून बाहेर पडावे लागले', असा आरोप कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रामदास राणे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.

  • Chiplun Congress Secretory Ramdas rane Meet Press

    चिपळूण- 'पक्षांर्तगत होणार्‍या अन्यायामुळेच आपल्याला शिवसेनेतून बाहेर पडावे लागले', असा आरोप कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रामदास राणे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.

    'मी 27 वर्षे शिवसेनेत होतो. परंतु कधी प्रसिद्धीसाठी काम केले नाही. असे असतानाही सभापती, तालुकापप्रमुख पदांवरून करून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी आपल्यावर नेहमी अन्याय केला. अनेक वर्षे सेनेचे काम केले मात्र संघरटनेने मला दिलेली पदे पूर्वसूचना न देता काढून घेतली. पदे काढून घेतल्याचे दु:ख नाही, परंतु याची कारणे तरी समजायला हवी होती. त्यामुळे इच्छा नसताना मला पक्षाला रामराम ठोकावा लागला.' असे राणे म्हणाले.

    शिवसेनेनंतर भास्कर जाधव यांच्यासोबत राष्ट्रवादीत गेलो. तेथेही प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले. परंतु तेथेही माझ्या कामाची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे नाईलाजामुळे राष्‍ट्रवादीला रामराम ठोकावा लागला. कॉंग्रेसने सन्माने पद देऊन पक्षात घेतले. जिल्हा सरचिटणीस पदाच्या निवडीवेळी कॉंग्रेसमधील कोणत्याही जुन्या- नव्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी माझ्या निवडीबद्दल नाराजी व्यक्त केली नाही. यातच कॉंग्रेस पक्षाचे विचार, परंपरा आणि अन्य पक्षांच्या तुलनेतील फरक असल्याचेही राणे यांनी सांगितले.

Trending