Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | chiplun crime two womans Arrested

चिपळूण तालुक्यात सहा लाखांच्या मुद्दे मालासह चोर जेरबंद

प्रतिनिधी | Update - Jan 10, 2013, 03:17 PM IST

पाटणला पळून जाण्याच्या तयारीत असलेले चोर कुटुंब चिपळूण तालुक्यातील अलोरे येथील नाकाबंदीत पोलिसांच्या तावडीत सापडले.

  • chiplun crime two womans Arrested

    आलोरे - पाटणला पळून जाण्याच्या तयारीत असलेले चोर कुटुंब चिपळूण तालुक्यातील अलोरे येथील नाकाबंदीत पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यांच्याकडून साधारण ९९ हजार रुपये रोख रकमेसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    चिपळूण अर्बन बँकेसाठीचे काही लाख रुपये घेऊन नंदकुमार मनोरकर एस.टीने निघाले होते. ते गाडीत बसल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ दोन महिला दोन लहान मुलांसह गाडीत बसल्या. मनोरकर यांच्या शेजारी बसलेली व्यक्ति खाली उतरल्यानंतर संशयित महिलांपैकी एक मनोरकर यांच्या शेजारी येऊन बसली. तिने मनोरकर यांना खिडकी उघडा, बंद करा असे बोलण्यात गुंगवून ठेवले. त्यांचे लक्ष्य विचलित करुन दुस-या महिलेने त्यांच्या पिशवीतील काही रक्कम लंपास केली आणि फरशी तिठा येथे दोघी उतरुन गेल्या.

    त्या महिलांच्या हलचालींची शंका आल्याने मनोरकर यांनी आपली पिशवी तपासली असता त्यांना त्यात दोन लाख रुपये कमी असल्याचे लक्षात आले. त्यांनी जवळच्या पोलिस ठाण्याला माहिती दिली. तसेच मनोरकर यांनीही तत्काळ एस.टीतून उतरुन फरशी तिठे गाठले आणि त्या महिलांचा शोध सुरु केला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आसपासच्या गावांमध्ये नाकाबंदी सुरु केली. या नाकाबंदीत महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकल्या.

Trending