Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Chiplun Sahitya Sammelan 2013

साहित्य हीच सर्वश्रेष्ठ कला - संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे मत

विशेष प्रतिनिधी | Update - Jan 11, 2013, 07:23 PM IST

मर्ढेकरांनी मांडलेल्या संगीत ही सर्वश्रेष्ठ कला हा मुद्दा खोडून काढतान संमेलनाध्यक्षांनी साहित्याला महत्त्वाचे मानत आणि साहित्यातील मुल्यांना महत्त्वाचे ठरवत साहित्य हीच सर्वश्रेष्ठ कला असल्याचे सांगितले.

 • Chiplun Sahitya Sammelan 2013

  यशवंतराव चव्हाणनगरी (चिपळूण) - साहित्य हीच सर्वश्रेष्ठ कला असल्याचे प्रतिपादन 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी शुक्रवारी केले. कविवर्य बा. सी. मर्ढेकरांनी संगीत ही सर्वश्रेष्ठ कला असल्याचे म्हटले होते. मात्र, मलातरी साहित्य हीच सर्वश्रेष्ठ कला असल्याचे वाटते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

  कोत्तापल्ले म्हणाले, संगीत हे साहित्याचे अंग आहे. त्यामुळे साहित्य हीच सर्वश्रेष्ठ कला आहे. साहित्य हे कोणासाठीही घातक नसल्याचे सांगत डॉ. कोत्तापल्ले यांनी साहित्य समाजातील प्रत्येकाच्या उपयोगी पडत असते असे म्हटले.

  वाचन संस्कृती वाढवण्याची गरज व्यक्त करत राज्यकर्ते, समाजाधुरिण यांनी त्यांच्या पातळीवर तरुणांमध्ये आणि समाजातील सर्व थरांमध्ये वाचन वाढवण्यासाठी योगदान देण्याची गरज व्यक्त केली. तसेच, सार्वजनिक वाचनालयांना शासनाने मदत करणेही महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.

  संमेलनापूर्वी वादांचे संमेलन झाले
  संमेलनाच्या अध्यक्षपदाची घोषणा झाल्यापासून आज पर्यंत अनेक मुद्यांवर वाद झाले. कधी संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवरील परशुरामाच्या चित्रावरुन तर कधी मुख्य व्यासपीठाला नाव देण्यावरुन वाद झाला. त्यामुळे हे वादांचेच संमेलन झाले असा चिमटाही कोत्तापल्ले यांनी कोणाचेही नाव न घेता काढला. या सर्व वादांबद्दल सध्या काही बोलणार नाही. समारोपाच्या भाषणात त्याबद्दलचे माझे मत व्यक्त करीन, असे कोत्तापल्ले यांनी सांगितले.

Trending