गुहागर तालुक्यात बंदुक / गुहागर तालुक्यात बंदुक विक्रीप्रकरणातून पाच आरोपींची निर्दोष मुक्तता

Mar 20,2013 02:10:00 PM IST

गुहागर - तालुक्यातील तवसाळ व काताळे या गावातील गावठी कट्टयाच्या बंदुकी विक्री प्रकरणी पाच आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या आरोपींना 22 नोव्हेंबर 2009 पासून पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते.


दिलीप काताळकर, रमेश काताळकर, विठ्ठल पाष्‍टे, शशिकांत बामणे, शंकर बामणे या आरोपींना निर्दोष मुक्त करण्‍यात आले.या पाच आरोपींनी तवसाळ व काताळे यागावात गावठी कट्टयाच्या बंदुकीची विक्री करत होते.त्यांना नोव्हेंबर 2009 साली पोलिसांनी अटक केली होती.

सरकारी पक्षाला या आरोपींविरूध्‍द कोणतेही पुरावे मांडता न आल्याने न्यायालयाने आरोपींना निर्दोष मुक्त केले.

X