Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | dapoli crime kidnapper arrest

सिनेस्टाईल थरार : अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा भामटा जेरबंद

प्रतिनिधी | Update - Aug 18, 2012, 01:52 PM IST

एका शाळकरी मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न करणा-या भामट्याच्या तावडीतून मुलीने पळ काढला आणि घर गाठले.

  • dapoli crime kidnapper arrest

    दापोली - तालुक्यातील करंजणी येथे सिनेस्टाईल थरारनाट्य घडले. एका शाळकरी मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न करणा-या भामट्याच्या तावडीतून मुलीने पळ काढला आणि घर गाठले. त्यानंतर पोलिसांनी त्या संशयिताला ताब्यात घेतले आहे.
    करंजणी येथील शिवाजी हायस्कुलमध्ये शिकत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला तुझी आई आजारी असल्याचे आदिनाथ माने याने सांगितले आणि सोबत चलण्याचा आग्रह केला. विद्यार्थिनीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्याच्या सोबत जाण्यासही नकार दिला. मात्र, वर्गशिक्षकांनी सांगितल्यानंतर ती तयार झाली. आदिनाथ तिला इनोव्हा गाडीतून घेऊन निघाला. काही अंतर गेल्यानंतर गाडी घराऐवजी दूस-याच दिशेला जात असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मात्र, गाडीच्या काचा बंद असल्याने तिचा आवाज बाहेर गेला नाही. त्याचवेळी गाडीचे चाक रुतल्याने गाडी थांबली. तिथे एक गावकरी गाडीचे चाक काढून देण्यासाठी मदतीला आला. त्याचवेळी अल्पवयीन विद्यार्थिनीने धाडस करुन गाडीतून पळ काढला आणि थेट घर गाठले. तिने घरच्यांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. पालकांनी तिला सोबत घेऊन दापोली पोलिस ठाण्यात सर्व हकिकत सांगितली त्यानंतर पोलिसांती तत्परता दाखवत संशयित आदिनाथला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध दापोली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (संग्रहित छायाचित्र)

Trending