महिनाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या / महिनाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह सापडला

प्रतिनिधी

Oct 23,2011 05:56:14 PM IST

रत्नागिरी - दापोली शहरातील नवभारत होस्टेलमध्ये राहणारी अंकिता चव्हाण (१६) या महिनाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह कळकीचाकोंडा परिसरात सापडला. कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह अढळून आला.
वराडकर महाविद्यालयात शिक्षण घेणारी अंकिता दापोलीतील नवभारत छात्रालयात रहात होती. १० सप्टेंबर पासून ती बेपत्ता होती. सकाळी मैत्रिणींसोबत महाविद्यालयात गेलेली अंकिता छात्रालयात परतलीच नसल्याचे छात्रालयाच्या अधिक्षीका पोते यांनी दयाळ येथे राहणा-या तिच्या पालकांना कळविले. त्यानूसार अंकिताच्या आईने पोलिसात तक्रार दिली. मात्र ज्या दिवशी अंकिता बेपत्ता झाली त्याच दिवशी ती दापोली बसस्थानकावर सकाळी १० वाजता तिच्या आईला भेटली होती, आणि त्याच दिवसापासून ती बेपत्ता झाली.
शनिवारी सकाळी गुरे चारणा-या व्यक्तीला कळकीचाकोंडा माळरानावर कुजलेल्या अवस्थेतील तरुणीचा मृतदेह आढळला. त्यांनी ही माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानूसार दोपोली पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेहावरील कपडे, शाळेची बॅग यावरुन हा बेपत्ता अंकिता चव्हाणचा मृतदेह असल्याचा संशय आला. तसेच त्या ठिकाणी उंदीर मारण्याच्या औषधाची बाटली आणि अर्धा पावाचा तुकडा देखील सापडला. अंकिताचा मृत्यू आत्महत्या आहे की, घातपात याचा पोलिस तपास करीत आहेत.

X
COMMENT